अहमदनगर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी
अहमदनगर जिल्ह्यातही पोलीस प्रशासन सतर्क, सन 2024 च्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणी पोलिसांचा रूट मार्च, नागरिकांनो, कायदा आणि सुव्यवस्था राखवा :- सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ संभाजी पुरीगोसावी (अहमदनगर जिल्हा ) प्रतिनिधी. राज्यांत सध्या सर्वत्र सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे तसेच या निवडणुका शांततेत पार पडाव्यात तसेच आगामी सण उत्सव साजरे होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनही चांगलेच सतर्क झाले असून. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी सण, उत्सवांच्या काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच ग्रामीण भागात कुठेही अनुचित घटना घडू नये याकरिता शांतता व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने लोणी पोलिसांचा नुकताच रूट मार्च काढला आहे. सदर रूट मार्च हा लोणी पोलीस ठाणे पासून ते बसस्थानक हद्दीतील बाभळेश्वर दूरक्षेत्र पिंपरी निर्मळ गाव बूथ मिश्रवस्ती गावांतून रूट मार्च करीत सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पोलिसांनी सूचना केल्या. सदर रूट मार्च हा अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक दोन पोलीस अधिकारी लोणी पोलीस ठाणेकडील पोलिस अंमलदार तसेच सीआरपी जवानांसह आदींनी या रूट मार्चमध्ये सहभाग आपला नोंदवला.
