नाशिक | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी – महादेव सवाई
नाशिक :- नाशिक शहरातील सुप्रसिद्ध गीतकार तथा कोवीड योध्दा उपाधी असलेल्या गौतम भाऊ पगारे यांनी पारंपरिक कोळी गीताचा नजराणा मराठी कोळीगीतांची आवड असणाऱ्या रसिकांसाठी आणला आहे” मासोळी मासोळी “या नावाने.भारतीय चित्रपट स्रुष्टीचे जनक तथा पितामह दादासाहेब फाळके कलावंत रंगमंच यांची” मासोळी मासोळी ” या कोळीगीतांची प्रस्तुती असुन दिपावलीच्या निमित्ताने नाशिक शहरातील व परिसरातील कलावंतांना घेऊन या सुंदर कोळीगीतांची निर्मिती केली गेली असुन,संपूर्ण महाराष्ट्रात ” मासोळी मासोळी “हा कोळीगीतांचा अल्बम धुमाकूळ घालतो आहे.नाशिक येथील गौतम भाऊ पगारे यांनी या गिताचे बोल अतिशय सुंदर रित्या लिहलेले असुन गौतम भाऊ पगारे यांनीच या गितांची निर्मिती केलेली आहे.या सुंदर गितांना आपल्या जादुई आवाजाने स्वरबद्ध केले आहे ते म्हणजे सौ.रुपाली विजय तायडे यांनी ,सौ.रुपाली तायडे यांचा स्वर जादुई मानला जातो,आजवर सौ.रुपाली तायडे यांनी विविध प्रकारच्या गाण्यांना स्वरबद्ध केलेले आहे.तर या जादुई आवाजाला संगीताची साथ दिली आहे जय रंगराज ढेंगळे यांनी ,जय रंगराज ढेंगळे यांनी सुध्दा अनेक गीतांना संगीतबद्ध केलेले असुन त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांवर संगीतप्रेमी थिरकल्या शिवाय रहात नाही हे त्यांच्या संगीतामध्ये विशेष मानले जाते.मासोळी मासोळी या कोळीगीतांचा अल्बम साँग् मध्ये काम करणारी ही सर्व टिम नाशिक रोड नाशिक या ठिकाणची असुन,सध्या कोवीड योध्दा गौतमभाऊ पगारे या युट्यूब चँनलवर ” मासोळी मासोळी” हा कोळीगीतांचा अल्बम धुमाकूळ घालतो आहे. या चँनलचे विव्स पाहता सदरील गीतांना महाराष्ट्रात पसंती मिळत असुन ,झपाटयाने प्रेक्षकांची संख्या वाढतांना दिसत असुन प्रेक्षकांच्या शुभेच्छाचा वर्षाव सध्या या गीतांवर होताना दिसुन येत आहे. सुप्रसिद्ध गीतकार गौतमभाऊ पगारे आणी त्यांच्या संपूर्ण टिमचे सर्व स्तरातून कौतुक होत असुन. पारंपरिक कोळीगीतांचा नजराणा पुन्हा आम्हा संगीत प्रेमींसाठी प्रस्तुत केल्याबद्दल संगीतप्रेमी यांनी गौतम भाऊ पगारे आणी त्यांच्या संपूर्ण टिमचे आभार मानत यापुढे सुध्दा उत्कुष्ठ गीतांच्या मालीका तुमच्या टिमकडुन आम्हाला ऐकायला आणी बघायला मिळाव्यात अशा मनपुर्वक शुभेच्छा प्रेक्षकांकडून देण्यात येत आहेत.
