मधुतारा फाउंडेशन | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
दिनांक 2 नोव्हेंबर रोजी मधुतारा फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून पुण्यातील दिवंगत शाहिद या तरुणाचा वाढदिवस जो आज हयातीत नाही पण हा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत ज्यांचे आपले म्हणून कोणी नाही अशा निराधारांना अन्नदान व एक महिना पुरेल अशा कोरडा शिधा म्हणजेच रेशन देऊन निराधार आजी आजोबांसोबत केक कापून सर्व शाहीदच्या तरुण मित्रांनी साजरा केला.
मधुतारा प्रमुखांचे पुतणे ची.सुमित सतीश शिंदे यांनी वाढदिवस आम्ही सर्व मित्र आपण ही समाजाचे देणे लागतो व आमच्या मित्राचा वाढदिवस खऱ्या अर्थाने त्याला श्रद्धांजली ठरो म्हणून आम्ही कुठ साजरा करू अस विचारलं असता मधु तारा प्रमुखांनी श्री दादा गायकवाड यांचे आसक् निराधार आश्रम सुचवलं व सर्व मित्रांनी एक मत करून सर्व नियोजन केले.
समाजाला एक आदर्श तरुणांनी घालून दिला.पुणे शहर फुरसुंगी हडपसर येथील अनाथ.निराधार.बेवारस यांचा सांभाळ करणारे कर्मवीर दादा गायकवाड यांच्याआश्रमामध्ये वाढदिवस साजरा झाला.
या वेळी दादा एम्बुलेंस घेऊन छतीसगड येथे असल्याने ते उपस्थित नव्हते पण दादा नसताना त्यांचे सहकारी ओलवेन सर आणि सौ कुशाताई दादा गायकवाड यांनी या कार्यासाठी सर्व तरुणांच्या विचारांची व कार्याची प्रशंसा करत आशीर्वाद दिले.या वेळी सर्व आजी आजोबांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेत सर्वाँना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी वेळोवेळी मधु तारा यांच्या सहकार्यातूनसामाजिक बांधिलकी जपणारे यांच्या माध्यमातूनआश्रमासाठी सेवा होत रहाते असे दादा यांचे सहकारी ऑलवेन सर यांनी व कुशा ताई यांनी म्हणत मधु ताराचे आभार मानले.मधु तारा प्रमुखांनी आसक् निराधार यांच्या सोबत असणे हे माझं भाग्यच असे म्हणले.
या वेळी अनेक सामाजिक कार्य करणारे माता भगिनी बंधू उपस्थित होते.
शाहीदच्या सर्व मित्रांनी पवित्र कार्य हातून घडल्या बद्दल आनंद व्यक्त करत सर्व निराधारांचे आशीर्वाद घेतले व दोन्ही संस्थेचे आभार मानले.
