शिवणे – सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवणे गणपती माथा येथे असलेल्या गणपती मंदिरात जयहिंद संस्थेचे संस्थापक कर्नल राहुलजी जेकब टोनी, कारगिल योद्धा गुरखा त्री नॉट त्रि हवालदार अजयकुमार थापा, व साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून तेथील प्रांगणात एक दिवा शहीद जवानांसाठी तीन हजार दिवे प्रज्वलित करत शहीद जवानांना हजारो नागरिकांच्या उपस्थिती अभिवादन करण्यात आले.
नवसाला पावतो तो गणपती पण नाव त्याच पावशा गणपती हजारो वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास असलेले हे मंदिर गेली वीस वर्ष इथे दिवाळी पाडव्या निमित्त रोषणाई करण्यात येते ती दिपमालांची याही वर्षी रोषणाई प्रांगणात करण्यात आली जवळपास तीन हजार दिव्यांची रोषणाई त्या दिपमांलेतून देवाचा देव आदिदेव भगवान शंकराचा त्रिशूळ ही बनविण्यात आला होता अतिशय मनमोहक दृश्य पाहून सर्वांच्या मनाला ते भावून गेले.
या वेळी विश्वस्तांच्या वतीने देशसेवा करत असलेले राहुलजी टोनी, अजयकुमार थापा, व साहित्यरत्न डॉ. गणेश राऊत यांचा यथोचित सन्मान मंदिराचे प्रमुख विश्वस्त श्री. अरुणजी दांगट पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख विश्वस्त अरुणभाऊ दांगट , दिनकर दांगट, तानाजी खेडेकर, काळूराम दोडके, यांनी केले होते.
या कार्यक्रमाला सरपंच सुभाष भाऊ नानेकर चेअरमन सुरेशभाऊ धावडे,अजिंक्य पोळ,सौ. माधवी दांगट, सौ. सोनालीताई पाटील ,नामदेव कांबळे,केशव नांदेडकर व अनेक देशभक्त व गणेशभक्त यांची उपस्थिती लाभली.
दरवर्षी या ठिकाणी दिपमाळेचे नियोजन दिवाळी पाडव्या निमित्त केले जाते तसेच एक दिवा शहीद जवानांसाठी लावून ज्यांनी दिलं बलिदान देशासाठी चला लावू एक दिवा शहीद जवानांसाठी हा संदेश देत दिवाळी साजरी न करता गोर गरिबांची दिवाळी कशी साजरी होईल याकडे आम्ही कायम लक्ष देत असतो असे प्रांजल मत यावेळी विश्वस्त अरुण भाऊ दांगट पाटील यांनी व्यक्त केले.
अतिशय सुंदर सूत्रसंचालन चंद्रकांत पंडित यांनी केले..