ठाणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी – सतिश कडू
सामाजिक समरसता गतिविधि, धरमपेठ महिला बँक व अंबाझरी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने फुटपाथ वरील गरजू लोकांमध्ये अनोखी दिवाळी साजरी केली, दिवाळी निमित्ताने त्यांच्या डोळ्यात आणले आनंदाचे प्रकाश शंकर नगर चौक येथील फुटपाथ वर खेळणी तोरण विकणाऱ्या गरीब लोकांना महिलांना व लहान मुलांना एकत्र करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्याचा अनोखा उपक्रम अंबाजरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गोल्हे व स्टाफ यांनी सामाजिक समरसता गतीविधी संस्था चे संयोजक श्री राजन भूत, श्री देशकर, श्री अविनाश काळे व त्यांचे सहकारी त्याचबरोबर धरमपेठ महिला सहकारी बँक अध्यक्ष श्रीमती नीलिमा बावणे यांच्या उपस्थितीत आज रविवार दिनांक 3/11/2024 रोजी सकाळी 09.00 ते 11.00 दरम्यान साजरा करण्यात आला यात फुटपाथ वरील 30 ते 40 महिला पुरुष व लहान मुले सहभागी झाली, त्यांना दिवाळीनिमित्त फराळ, मिठाई वाटप करण्यात आले.
यावेळी त्यांना, त्यांचे जीवन जरी फुटपाथवर असले, व खेळणी विक्री मधून होत असलेल्या कमाई मधून आपल्या मुलांना शाळेत पाठवून शिक्षण द्यावे व जीवनात काहीतरी करण्यासाठी प्रेरित करावे व आपल्या फुटपाथ वरील जीवनातून सुद्धा भविष्यात अधिकारी घडवू शकतात यासाठी पोलिसांची काहीही मदत लागल्यास सदैव तत्पर असल्याचे आश्वासन अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गोल्हे यांनी दिले, त्याचबरोबर थोड्याशा पैशाच्या लालच मध्ये न अडकता व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबत मुलांचा संपर्क न ठेवण्याचे, व कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे न वळण्याबाबत आवाहन केले, त्याचबरोबर धरमपेठ महिला बँकेतर्फे महिलांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ फुटपाथ वरील महिलांकरता देण्यात येईल व त्यांच्या मुलांसाठी सुद्धा काही शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येईल असे आश्वासन धरमपेठ महिला बँकेच्या अध्यक्षा श्रीमती नीलिमा बावणे यांनी केले, व सामाजिक समरसता गतिविधि ही संस्था मागील अनेक वर्षापासून समाजातील वेगवेगळ्या घटकातील लोकांसाठी चांगले उपक्रम घेऊन त्यांच्या जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना श्री राजन भूत यांनी व्यक्त केले,
अशाप्रकारे दिवाळीच्या निमित्ताने समाजातील फुटपाथ वरील जीवन जगणाऱ्या लोकांच्या मध्ये सहभागी होऊन त्यांची लहान मुले यांच्या डोळ्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.