यात्रा | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.
करंजखोपच्या श्री. चवणेश्वर देवाच्या यात्रेंस शनिवारपासून प्रारंभ, चांगभले,चा गजर यात्रेनिमिंत्त विविध कार्यक्रम, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील मौजे. करंजखोप येथील श्री. चवणेश्वर देवाची वार्षिक यात्रा रविवार (दि. 27 ) व सोमवार (दि. 28 ऑक्टोबर) असून यात्रेनिमिंत्त विविध धार्मिंक संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करंजखोप ग्रामस्थ यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगांव आणि वाई तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या चवणेश्वर डोंगराला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा पाया महान तपस्वी च्यवणऋषी यांनी घातलेला आहे. तसेच छत्रपतींच्या स्वप्नातील स्वराज्याची स्थापना करण्यासाठी चवणेश्वरांच्या कडया कपाऱ्यातील मावळ्यांनी छातीचा कोट करून लढाई जिंकली याचीही इतिहासांत नोंद आहे. याच ऐतिहासिक जिल्ह्यातील कोरेगांव व वाई तालुक्यांच्या सीमेवर समुद्रसपाटीपासून 1300 फूट उंचीवर चवणेश्वर हे ऐतिहासिक ठिकाण म्हणून ओळखले जाते, या ठिकाणी देवाचे वैद्य अश्विनीकुमार यांचे मित्र सप्तऋषींपैकी एक भृगपुत्र तपोभूमी म्हणून या गावांचे वेगळेच महत्त्व असल्यामुळे राज्यांच्या कानाकोपऱ्यांतून भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. श्री.चवणेश्वर नाथ साहेबांच्या डोंगरावर श्री. महादेव व जानुबाई देवीची मंदिरे असून. या याही मंदिरांचा काहीच वर्षांपूर्वी जीर्णोद्धार झाला आहे. चवणेश्वरांच्या डोंगरावर श्री. चवणेश्वर महादेव जानुबाई ही तीन मंदिरे असून गावापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलात श्री. केदारेश्वरांचे मंदिर आहे. हे मंदिर पांडव कालीन असल्याचे सांगितले जाते या ठिकाणी वर्षभरही राज्यांच्या कानाकोपऱ्यांतून भाविक येत असतात विशेषता: दर रविवारी,सोमवारी अमावस्या पौर्णिमेला या ठिकाणी मोठी गर्दी असते. दरवर्षींच आश्विन महिन्यांतील चौथ्या रविवारी श्री. चवणेश्वरांची यात्राही मोठी भरते. शनिवारी रात्री गावातून छाबिना निघतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील मानाची लोटांगणे होतात. दुपारी श्री. चवणेश्वर डोंगरावर सासनकाठी व गुळुंच्या सासनकाठ्याची भेट होते. यावेळी वाण्याचीवाडी वरखरवाडी,करंजखोप रणदुलाबाद,मोरबंदे सोनके,हिवरे,तरडगांव आदी ठिकाणाहून सासनकाठया येत असतात.सासन काठ्यांचा भेट सोहळा पाहण्यासाठी हजारों भाविक भक्तगणांची उपस्थिती असते. यात्रेदिवशी करंजखोप गावातील मंदिर परिसरांत असलेल्या आंब्याच्या झाडाला आंबे,मोहोर लागतो, अशी येथील अख्यायिका आहे. या सोहळ्यासाठी राज्यांच्या कानाकोपऱ्यांतून भाविक भक्तगण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. यात्रेदिवशी दिवसभर चांगभले, चा गजर भाविकांमधून होत असतो. चांगभले,च्या या गजरांने संपूर्ण श्री.नाथ साहेबांची नगरी दुमदुमून जाते. यात्रेनिमिंत्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून वाठार पोलीस ठाणेचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो.