मधुतारा फाउंडेशन | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संतोष लांडे.
मधुतारा फाउंडेशनच्या पुण्यातील सौ मायाताई पवार यांची कात्रजच्या बसच्या प्रवासात एका पायाने दिव्यांग असलेल्या विजयामाला यांच्याशी ओळख झाली.सर्व माहिती विचारल्यावर लहानपणापासूनच दिव्यांगत्च असल्याचे कळाले मायाताई यांनी आमचं मधु तारा दिव्यांग सेवा फाऊंडेशन आहे मी तुझ्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष शिंदे साहेबांना विचारते अस सांगितल.
श्री शिंदे यांच्या सोबत संपर्क झाल्यावर पुण्यातील महावीर संस्थेला फोन करून सदर मुलीची माहिती श्री शिंदे यांनी दिली.पहिलं माप घेऊन नंतर तारीख दिली व विजया यांच्या पायाच्या मापाचे केलीपर बेल्ट बसवण्यात आले.
रोज हा बेल्ट वापरल्यास तीन महिन्यात पाय सरळ होऊन व्यवस्थित चालता येईल असे महावीर संस्थेचे टेक्निशियन श्री पाटील साहेब यांनी सांगितले.
या वेळी चालून सरावही करण्यात आला.अत्यंत आनंदात आणि उत्साही असलेल्या विजया यांनी महावीर संस्थेचे व मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.
या वेळी विजयामाला आणि मधु तारा प्रमुख यांनी मधु तारा प्रत्येकांसाठी प्रत्येक जण मधु तारा साठी असे म्हंटले.