चाकण | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : प्रशांत काजळे.
बिरदवडी फाटा येथे चोरट्यांनी ATM फोडून १२ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न केला. पण महाळुंगे MIDC पोलिसांनी घटनेची समय सूचकता बघून चोरट्याच्या गाडीचा पाठलाग करून शेवटी चोरट्यांना त्यांची गाडी सोडून पळून जावे लागले. यामुळे १२ लाख रोख रक्कम पळून नेण्यास चोरटे अपयशी ठरले.
पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून, शनिवार(दि. १९) रोजी मध्यरात्री १२:५० वाजताच्या दरम्यान महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बिराजदार व पोलीस शिपाई माटे हे गस्त करत असताना ठाणे अंमलदार होळकर यांना माहिती समजली की, बिरदवडी फाटा येथे चोरट्यांकडून ATM फोडण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलीस शिपाई माटे यांच्यासह इतर सहकारी पोलीस घटनास्थळी गेले असता तिथे ATM फुटले असल्याचे निदर्शनास आले. त्यावर महाळुंगे MIDC पोलिसांनी समयसूचकता दाखवत पोलीस हवालदार चापले, पोलीस नाईक काळे, पोलीस शिपाई लोखंडे यांनी भांबोली फाटा येथे नाकाबंदी करण्यास व पोलीस शिपाई गायकवाड व पोलीस नाईक गभाले यांनी वरिष्ठाच्या सूचनेनुसार आंबेठाण चौक चाकण येथे नाकाबंदी केली. इतर पोलिसांनी पोलीस गाडीच्या सहाय्याने वाकीकडे जाणाऱ्या रस्त्याने चोरट्याचा शोध सुरु केला. त्याच रस्त्यावर वीट भट्टीच्या बाजूला एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी पोलिसांना थांबल्याचे दिसून आले.
पोलिसांनी गाडीची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता स्कॉर्पिओ गाडी चालकाने थेट पोलीस गाडीला समोरून जोराची धडक मारून बिरदवडी गावाच्या दिशेने जोरात गेली. तिथेही पोलीस असल्याचे समजतात चोरट्यांनी गाडी आंबेठाण चौकाकडे वळवली पण तिथेही पोलिसांनी मोठा कंटेनर आडवा लावून चोरट्याना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानी पोलिसांचा पाठलाग काय थांबत नाही आणि आता आपण पकडले जाऊ हे चोरट्याच्या लक्षात येताच त्यांनी एका सोसायटीत गाडी घातली. पण रस्ता पुढे रस्ता बंद असल्याने शेवटी चोरट्याना गाडी सोडून पळून जावे लागले. गाडीत ५ ते ६ चोरटे असल्याची माहिती मिळाली आहे. गाडीत दिल्ली पोलीस गणवेश व ATM फोडून पळवलेली १२ लाख रुपयाची रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून आरोपीचा शोध सुरु आहे.
सदर घटनेच्या बाबत विविध कलमांच्या अंतर्गत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.
