पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : गोपाळ भालेराव.
सिंहगड (पुणे ) आज दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ गुरुवार रोजी पोलीस अंमलदार स्वप्निल मगर व पोलिस अंमलदार विनायक मोहिते यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता धायरी.नऱ्हे. भागात एक ईसम अवैद्यरित्या गावठी पिस्टल जवळ बाळगून सदर भागात फिरत असून अशी खात्रीशीर बातमी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनी.सचिन निकम यांना कळविले असता. त्यांनी सदर ठिकाणी जाऊन बातमीची खात्री करून घेऊन पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी आदेश दिले.सदर कार्यवाही करण्यासाठी सपोनी सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर /पोलीस हवालदार २४६पोलीस शिपाई ८६००/ पोलीस शिपाई ०३ / मोहिते पोलीस शिपाई /१०५१० शेडगे पोलीस शिपाई /८३ ४३ पाटील पोलीस शिपाई /१०२१५ पंधरा दोन पंच असे खाजगी वाहनातून पंचनामा करण्यासाठी लागणारे सर्व साधनसामग्रीसह.लॅपटॉप प्रिंटरसह.रवाना झाले वडगाव पुलाखाली पुणे येथे ०३:०० वाजता सुमारास स्वप्निल मगर. विनायक मोहिते व शिवाजी क्षीरसागर यांना त्यांचे खास बातमीदार मार्फत पुन्हा खात्रीशीर बातमी मिळाली असता दोन-तीन इसमांच्या घोळक्यामध्ये कळ्या रंगाचा शर्ट व जीन्स पॅन्ट घातलेला जो इसम उभा आहे त्याच्याजवळ गावठी पिस्टल व जिवंत काढतुसे असून ते नवीन कॅनल रोड आनंदवन हेरिटेज बिल्डिंग जवळ हिंगणे खुर्द पुणे येथे उभे आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पुन्हा वरिष्ठांना कळवून माननीय वरिष्ठांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने त्यांच्या मार्गदर्शनानुसार लागलीच वडगाव ब्रिज येथून निघून मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी अलीकडे गाडी थांबून बातमीप्रमाणे खात्री करता बातमीतील वर्णनाप्रमाणे तिन्ही ईसम हे पोलीस कर्मचाऱ्यांची नजरा नजर होताच सदर ठिकाणाहून पळून जात असताना वरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ०४:१० वाजून सुमारास त्यांना पकडून त्यांची नावे व पत्ता विचारत त्यांची नावे व पत्ता राज रवींद्र जागडे वय( २२ वर्षे )राहणार आझाद मित्रमंडळाजवळ.सरळ वस्ती. वडगाव. (बुद्रुक) पुणे व दोन विधी संघर्षात बालक यांच्या ताब्यात ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल व तीन जीवन काढतुस मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.व गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत.
