पुणे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी (पुणे शहर)
स्वारगेट पोलिसांची दमदार कामगिरी, गाड्यांच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी, रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अखेर बेड्या ठोकल्या, संभाजी पुरीगोसावी ( पुणे शहर ) प्रतिनिधी. स्वारगेट पोलीस ठाणेच्या परिसरांत रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात आलेल्या गाड्यांच्या काचा फोडून गाडीचे नुकसान करीत लॅपटॉप आणि रोख रक्कम चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला स्वारगेट पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये याप्रकरणी आरोपी सुरेशकुमार पांडुरंगन सेरवई (वय 50 रा. रामजीनगर पुंतनूर ता.श्रिमरंगम जि. त्रियापल्लवी तामिळनाडू ) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे, त्याने त्याचा साथीदार सेथील कुमार महालिंगन(वय ४०) याच्यासह पुणे शहरांत वेगवेगळ्या पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये एकूण 11 वाहनांच्या काचा फोडून 11 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती पोलीस उपायुक्त सर्मातना पाटील यांनी दिली आहे. याबाबत स्वारगेट पोलीस ठाणेत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर तक्रारदार यांची फॉर्च्यूनर गाडी रस्त्याच्या कडेला पार्किंग,लॉक केली होती. असताना अनोळखी व्यक्तीने गाडीची काच फोडून लॅपटॉप व अँपल कंपनीचा इअर पाड असलेली बॅग पळवून नेली होती याबाबत स्वारगेट पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या पथकांने आरोपींचा शोध घेण्यास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी सदर गुन्ह्यातील लॅपटॉपचे लोकेशन बेंगळूरु येथे दिसून आले त्यामुळे स्वारगेट पोलिसांनी बंगळूरु पोलिसांची संपर्क करून सदर व्यक्तीस ताब्यांत घेण्यास सांगितले, त्यानुसार तपास पथकांतील स.पो.नि. चांगदेव सजगणे पोलीस अंमलदार फिरोज शेख व सुजय पवार यांना बंगळूर येथून सुरेशकुमार सेरवईला आरोपीला ताब्यांत घेण्यात आले, त्याच्या कब्जांतून सुमारे गुन्ह्यातील दीड लाख रुपये किंमतीचे अँपल कंपनीचा एक डील कंपनीचा लॅपटॉप असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, पुण्यात स्वारगेट खडक चंदननगर डेक्कन येरवडा परिसरांत त्यांनी अशा प्रकारे चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे, त्याच्यावर यापूर्वी मुंबईत देखील तीन गुन्हे दाखल आहेत, सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार रंजनकुमार शर्मा सहा. पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त समार्तना पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ -२ राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे स.पो.नि. चांगदेव सजगणे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे यांच्यासह पोलीस ठाणेकडील आदीं पोलीस अंमलदार हवालदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.