सातारा | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | कार्यकारी संपादक – किरण सोनवणे.
सातारा : जिल्ह्याच्या विद्यमान आयपीएस अधिकारी डॉ . वैशाली ईश्वर कडूकर मॅडम यांची सातारा पोलीस मुख्यालयातील त्यांच्या दालनात जयहिंद मॅडम असे म्हणत … संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांचे अभिनंदन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या, राज्यांतील मागील काही दिवसांपूर्वी म्हणजेच ( दि 14 ऑगस्ट 2024 ) रोजी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. त्यात जवळपास 11 अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने साताऱ्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी यांची समादेशक राज्य राखीव पोलीस बल पुणे येथे बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर सोलापूर येथील कार्यरत असणाऱ्या पोलीस प्रशिक्षण प्राचार्य केंद्र सोलापूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली ईश्वर कडूकर यांची नियुक्ती करण्यात आली असून. डॉ. वैशाली ईश्वर कडूकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून (दि. 31 ऑगस्ट ) रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. डॉ. वैशाली कडूकर या शिस्तप्रिय आणि डॅशिंग महिला पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात त्यांची ओळख असून तळागाळातून कष्ट व चिकाटीने प्रयत्न करीत एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवून यश प्राप्त करणाऱ्या जिगरबाज महिला अधिकारी आहेत. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम यांनी देखील आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात प्रयत्नशील राहिल्या, त्यांना सातारा जिल्हा पोलीस दलात दोनदा संधी मिळाली होती. त्या सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या त्या पत्नी होत्या, नूतन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी देखील आत्तापर्यंत उस्मानाबाद पुणे ग्रामीण ( हवेली ) सीआयडी ( पुणे ) सांगली,सोलापूर शहर अशा विविध जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा दिली.