गिरीश परदेशी | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादक – संतोष लांडे.
या सुखांनो या, वहिनीसाहेब, तुजविण संख्या रे, मृत्युंजय कर्णाची अमरगाथा , जयोस्तुते , वेग , कादंबरी, यासारख्या अनेक मराठी मासिकांत काम केले. गणरंग निर्मित तोच परत आलाय व ओम नाट्य गंधा निर्मित संगीत सौभद्र या व्यावसायिक नाटकात देखील गिरीश ने काम केले. फॉरेनची पाटलीण , मर्मबंध व राष्ट्रीय पुरस्कर विजेती बार्डो या सिनेमात देखील त्याने मुख्य भूमिका केल्या आहेत! पण २०१४ पासून प्रशिक्षण व प्रायोगिक रंगभूमी वर लक्ष केंद्रीत केले होते ! आणि आता पुन्हा १० वर्षांनी गिरीश टीव्ही मालिकेत पदार्पण करतोय. स्टार प्रवाह वरील “उदे गं अंबे कथा साडेतीन शक्ती पीठांची “ या महेश कोठारे निर्मित मालिकेत गिरीश रेणू राजाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतोय. स्टार प्रवाह वरील अंतरपाट, तुझं नि माझं घर श्रीमंतांचं , महाराष्ट्राचे नच बलिये , तुजविण संख्या रे आणि जयोस्तुते या मालिका त्याने यापूर्वी केल्या होत्या .
महाराष्ट्रात माहुरची रेणूका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी , तुळजापूर ची भवानी माता व वणीची सप्तश्ृंगी माता हि स्थाने देवीची साडेतीन शक्ती पीठे म्हणून पूजली जातात. त्या देवींचा इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे ११ ऑक्टोबर पासून दररोज संध्याकाळी ६.३० वाजता . स्टार प्रवाह वर “उदे गं अंबे कथा साडेतीन शक्ती पीठांची हि मालिका प्रक्षकांसमोर येत आहे.