एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसांची तत्पर कारवाई, आरोपीला ठोकल्या बेड्या

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसांची तत्पर कारवाई, आरोपीला ठोकल्या बेड्या

प्रतिनिधी | प्रणित काठोके

मुक्ताईनगर तालुक्यांतील एका ठिकाणी अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना 28 मार्च 2026 रोजी उघडकीस आली आहे. पोलीसांकडून
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संबंधित मुलगी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेली असता, तेथील मालकांने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर मुलीने घरी जावुन आपल्या सोबत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली घेत तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी कोणताही विलंब न लावता तात्काळ गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे गतिमान करीत वेगाने तपास सुरू करून आरोपींचा शोध घेवुन अल्पावधीतच त्याला ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. या जलद कारवाईमुळे नागरिकांकडून पोलिसांच्या तत्परतेचे विशेष कौतुक होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध BNS 2023 अंतर्गत कलम 74, 75(1), 351(2) तसेच Protection of Children from Sexual Offences Act, 2012 अंतर्गत कलम 8 व 12 नुसार गुन्हा नोंदविला आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link