एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुक्ताईनगरात गुटखा तस्करीवर कारवाई; 6.48 लाखांचा मुद्देमाल जप्त

🚨 *मुक्ताईनगरात गुटखा तस्करीवर कारवाई; 6.48 लाखांचा मुद्देमाल जप्त*

प्रतिनिधी | प्रणित काठोके
दिनांक 26 मार्च 2026 रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाटा ते सुकडी गावादरम्यान राशा बर्डा परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मोठी कारवाई करत गुटखा साठा जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत शिवाजी सुरवसे (रा. सावरगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांच्या ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये केसरयुक्त ‘विमल पान मसाला’ व V1 तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या साठ्याची किंमत सुमारे 2 लाख 43 हजार 360 रुपये असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय, MH 14 DX 1463 क्रमांकाचे सुमारे 4 लाख रुपये किमतीचे वाहन व ‘विवो’ कंपनीचा 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 6 लाख 48 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी योगराज किशोर सूर्यवंशी (जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
⚖️ राज्यात गुटखा विक्री व साठवणुकीवर बंदी असताना अशा प्रकारच्या कारवायांमुळे बेकायदेशीर तस्करीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link