एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्री.बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयात “जागतिक ग्राहक हक्क दिन” उत्साहात संपन्न

श्री.बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयात “जागतिक ग्राहक हक्क दिन” उत्साहात संपन्न

प्रतिनिधी समाधान पाटील

*दोंडाईचा-*
नंदुरबार तालुका विधायक समितीचे श्री.बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालय, नंदुरबार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नंदुरबार’ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक हक्क दिन २०२६ नुकताच आज साजरा करण्यात आला आहे.

यावेळी महाविद्यालयातील मुट कोर्ट हाॅल येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून न्या श्री. महेंद्र पाटील सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार आणि मा.श्री.डी.एम. प्रसन्ना, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, नंदुरबार उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्रशासकीय समन्वयक प्रा. डॉ. एम. एस. रघुवंशी होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एन. डी. चौधरी यांनी केले.त्यात त्यांनी ग्राहक हक्क जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता सांगून निष्पक्ष, सुरक्षित आणि पारदर्शक बाजारपेठ सुनिश्चित करण्यासाठी ग्राहक संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असून ते ग्राहकांना फसवणूक, सुरक्षेचे धोके आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसारख्या अनैतिक व्यावसायिक पद्धतींपासून सुरक्षित ठेवते असे प्रतिपद केले. न्या.श्री. महेंद्र पाटील यांनी त्यांच्या ग्राहक संरक्षणाची संकल्पना ही ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यावर आधारित असल्याचे सांगून व्यवसायांकडून होणाऱ्या अनैतिक गैरव्यवहारांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी ही संकल्पना महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आपल्यापैकी प्रत्येक जण, कोणत्या ना कोणत्या प्रकारे, एक ग्राहक आहे. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांचा एक जागृत व सुजाण ग्राहक असणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे असून ग्राहक म्हणून आपले अधिकारांची माहिती असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मा.श्री. डी. एम.प्रसन्ना यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘ग्राहक संरक्षण कायदा, २०१९’ या कायद्याने १९८६ चा कायद्याचे निरसन करून नवीन कायदा २० जुलै २०२० रोजी अंमलात आला आहे. भारतातील ग्राहक हक्कांचे आधुनिकीकरण करणे हा या कायद्यामागील उद्देश होता. या कायद्यात ई-कॉमर्ससाठीच्या तरतुदी, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी कठोर दंडाची तरतूद, ‘केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणा’ची स्थापना आणि उत्पादक व विक्रेत्यांसाठी ‘उत्पादन दायित्वा’ची तरतूद यांचा समावेश आहे. त्यांनी ग्राहक हक्कांच्या मान्यतेविषयी सविस्तर चर्चा केली; ज्यामध्ये सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा हक्क, निवडीचा हक्क आणि आपले म्हणणे मांडण्याचा, ऐकून घेतले जाण्याचा हक्क यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. हासानी यांनी ग्राहक हक्क आणि संरक्षणाशी संबंधित विविध केसेस च्या माध्यमातून ग्राहक सुरक्षा विषयी माहिती दिली.
महाविद्यालयाच्या रौप्य वर्षी महोत्सव सुरु असून २५ वर्षांची महाविद्यालयाची यशाची वाटचाल सांगणाऱ्या ‘महाविद्यालयीन स्मरणिकेचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

तसेच यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मयुरी चौरे यांनी केले. कार्यक्रमात विधी महाविद्यालयाचे विध्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे मा.चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळाने प्रोत्साहन दिले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link