नायगाव पोलीस स्टेशनमध्ये न्यायासाठी आंदोलन एका पीडीत मुलीवर यादव नावाच्या नराधमांने बलात्कार केल्याचा प्रयत्न
प्रतिनिधी मुकुंद मोरे
नायगाव परिसरातील एका पीडित मुलीवर यादव नावाच्या नराधमाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीची आई नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेली असता पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल न घेता फक्त साधी NC नोंद केली आणि पुढील कोणतीही कारवाई केली नाही. इतकेच नाही तर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठीही पाठवले नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या संदर्भात मी ११ तारखेला नायगाव पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यासाठी गेले असता अधिकारी संजय हजारे साहेबांनी “उद्या या, चौकशी करू” असे सांगितले. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही.
म्हणून १३ तारखेला मी पीडित मुलगी व तिच्या आईला घेऊन नायगाव पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि जाब विचारला. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत “काय करायचे ते करून घ्या” असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्येच बसून आंदोलन सुरू केले.
सुमारे २० मिनिटांनंतर संजय हजारे साहेबांनी आम्हाला बोलावले, शांतपणे चर्चा केली आणि आरोपी यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सांगितले.
महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अशी उदासीनता अजिबात सहन केली जाणार नाही. पीडितेला न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू.









