एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या गुहागर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

गुहागर पोलिस ठाणे हद्दीतील शृंगारतळी बाजारातपेठेत झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नाचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले
प्रतिनिधी मुकुंद मोरे

घरफोडी प्रकरणी ४ जण गजाआड
गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठेत झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नाचा छडा लावण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे. या प्रकरणी मुंबईतील घाटकोपर आणि कुर्ला भागातून चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून सुमारे ११.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील शृंगारतळी बाजारपेठ येथील ओंकार ज्वेलर्स या दुकानात दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ०१.३१ वा. अज्ञात व्यक्तींनी दुकानाचे बाहेरील शटरचे लॉक तोडून आत प्रवेश करून आतील शटर तोडण्याचा प्रयत्न केला होता. या घटने प्रकरणी गुहागर पोलीस ठाणे येथे संशयित आरोपीविरुद्ध घरफोडीचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक ११/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (६), ३३१ (४), ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने या गुन्हाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने तांत्रिक तपास, सी.सी.टी.व्ही. फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे निशांत सुधीर आंबोकर रा. बीएसटी कॉलनी, पंतनगर, घाटकोपर मुंबई, मोईन शकील शेख रा. गोपाल भवन, घाटाकोपर, मुंबई, सुमित कुलदीप चुनियाना रा. कोहीनुर सीटी, कुर्ला, मुंबई आयुष जितेंद्र घागडा, रा. तानसा पाईपलाईन, लक्ष्मण नगर, घाटकोपर, मुंबई यांना पंतनगर घाटकोपर, मुंबई येथून ताब्यात घेतले आहे.
या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले एक चारचाकी वाहन तसेच गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य असा एकूण ११ लाख ९५ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास गुहागर पोलीस ठाणे करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, रत्नागिरी नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व श्रे.पो.उनि. संदीप ओगले, पो.हवा. विजय आंबेकर, पो.हवा. गणेश सावंत, पो.हवा. दिपराज पाटील, पो.हवा. योगेश नार्वेकर व चा.पो शि.अतुल कांबळे या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link