एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अवैध दारू विक्री प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप; मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी ACBच्या जाळ्यात

अवैध दारू विक्री प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप; मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी ACBच्या जाळ्यात

मूर्तिजापूर (प्रतिनिधी) –निलकंठ वसु पाटील

अवैध दारू विक्री प्रकरणात कारवाई न करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन बिट पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडल्याची कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना होती. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी बिट पोलीस कर्मचारी रडके व कानडे यांनी संबंधित व्यक्तीकडून ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती.

या तक्रारीची पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. ACBचे उपनिरीक्षक मिलिंद बाहकार यांच्या मार्गदर्शनाखाली अनभोरा येथे ही कारवाई करण्यात आली. सापळ्यात संबंधित दोन्ही पोलीस कर्मचारी लाच स्वीकारताना जाळ्यात अडकले.

या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, घटनेमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी लाच मागितल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link