एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अवैधरित्या धंद्यावर वर्धा पोलिसांची कारवाई, विशेष मोहीमेत 104 गुन्हे दाखल 1कोटी 66 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अवैध दारूविक्रेत्यांवर वर्धा पोलिसांची ‘वॉशआऊट’ मोहीम; १०४ गुन्हे दाखल, १ कोटी ६६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

प्रतिनिधी अब्दुल कदीर शेख
………………………………..
जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व निर्मितीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने दि. ९ मार्च २०२६ रोजी नियोजनबद्ध पद्धतीने “वॉशआऊट मोहीम” राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान जिल्हाभरात एकूण १०४ गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे १ कोटी ६६ लाख रुपयांचा दारूसाठा व संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन या विशेष मोहिमेची आखणी केली होती. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू गाळून तिचा साठा करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मागील ५ ते ६ दिवसांपासून शहरालगतचे परिसर, गावाबाहेरील शिवार, जंगल परिसर तसेच दुर्गम भागात पोलिसांनी गोपनीय पाळत ठेवली होती.
या मोहिमेत पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा व इतर शाखांचे एकूण ३७७ पोलीस कर्मचारी सहभागी झाले. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र पथके तयार करून पहाटे ४ वाजल्यापासून गावठी दारूभट्ट्यांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान १०९ आरोपींविरुद्ध १०४ गुन्हे नोंद करण्यात आले. तसेच तपास प्रक्रियेत ‘ई-साक्ष्य अॅप्लिकेशन’ (E-Sakshya Application) चा वापर करून तांत्रिक पुरावेही संकलित करण्यात आले.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, “वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार सहन केले जाणार नाहीत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि अवैध दारू विक्रेत्यांवर आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या अचानक ‘वॉशआऊट’ मोहिमा पुढेही राबविण्यात येतील.”
या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार व विक्रेते यांच्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी भविष्यातही अशा कठोर कारवाया सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link