एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

दैनिक दक्षवेध चा प्रथम वर्ष प्रथम अंक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

दैनिक दक्षवेध चा प्रथम वर्ष प्रथम अंक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

पत्रकारांनी आमचे मार्गदर्शक व्हावे आणि सत्य असल्यास निर्भीडपणे बातमी लावावी : आमदार खोतकर

दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ शनिवार रोजी हॉटेल सागर इन, कलावती हॉस्पिटल शेजारी, अंबड चौफुली जवळ, जालना येथे दैनिक दक्षवेध च्या प्रथम अंकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार श्री अर्जुनरावजी खोतकर, अध्यक्ष विधिमंडळ अंदाज समिती, महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भास्करराव आंबेकर, माजी नगराध्यक्ष हे होते. इतर मान्यवरात सौ. दर्शनाताई झोल – खोतकर, नगरसेविका, मनपा, सौ. संध्याताई देठे, नगरसेविका, मनपा, सौ मंगलताई गरदास, नगरसेविका, मनपा, लोकनेते श्री पंडित अण्णा भुतेकर, श्री मिर्झा अन्वर बेग, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष, रा. कॉ. पार्टी, डॉ. प्रदीप हुशे, जालना हॉस्पिटल, डॉ. सतीश साळुंके, कलावती हॉस्पिटल, अॅड. जगन्नाथ भुतेकर, श्री नंदकिशोर गरदास, श्री संजय देठे, श्री संदीप पैठणे, श्री पांडव इत्यादींनी उपस्थिती नोंदवली आणि आपल्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर दैनिक दक्षवेधच्या प्रथम अंकाचे अधिकृत प्रकाशन उद्घाटक मान. आमदार श्री अर्जुनरावजी खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. याबरोबरच माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समिती या राज्यभरातील ३५ जिल्ह्यात कार्यरत असलेल्या संघटनेच्या अधिकृत वेबसाईट www.mapsps.org आणि दैनिक दक्षवेधच्या अधिकृत www.dakshvedh.co.in या न्यूज पोर्टलचे उद्घाटन देखील मान. खोतकर साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलतांना मान. खोतकर साहेबांनी आपल्या भाषणात दैनिक दक्षवेधची भूमिका सत्याचा शोध, समाजाचा वेध, अन्यायाला वाचा फोडणे, निष्पक्ष, निर्भीड, एका विचार प्रवाहाची, एका जबाबदारीची आणि एका प्रामाणिक वचनबद्धतेची सुरुवात असल्याचे नमूद करून, बातम्यांच्या गर्दीत सत्य हरपत चालले आहे, विश्वासार्हता दुर्मिळ होते आहे, याविरुद्ध आपले दैनिक विश्वास, पारदर्शकता आणि निर्भीड पत्रकारितेचे व्यासपीठ होईल अशी आशा व्यक्त केली. सत्य असल्यास निर्भीडपणे बातमी लावावी, समाजाला दिशा देणारी पत्रकारिता हवी आहे, शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण जनता यांचा आवाज होण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा, पत्रकारांनी आमचे मार्गदर्शक व्हावे, आपली एक बातमी आम्हाला निश्चितपणे एका लाक्षाकडे घेवून जावू शकते, दैनिक दक्षवेध, हे नाव खूप सुंदर आहे, अशीच भावना देखील सुंदर असेल यात शंका नाही. आज आपल्या प्रथम अंकाचा शुभारंभ झाला असे जाहीर करून आपणास शुभेच्छा देतो.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सखारामपंत कुलकर्णी यांनी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समितीची आजपर्यंतची वाटचाल याबद्दल थोडक्यात माहिती देवून, आधी साप्ताहिक दक्षवेध आणि आज प्रारंभ होत असलेले दैनिक दक्षवेध यामागील समितीची आणि व्यवस्थापनाची मूळ भूमिका सांगितली. समाजाभिमुख कार्यात अग्रेसरपणे कार्यरत असलेल्या समितीला स्वतःचे हक्काचे व्यासपीठ समितीचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आणि दैनिकाचे संस्थापक आणि मुख्य संपादक श्री महेश सारणीकर यांनी दैनिक दक्षवेधच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे. समाजातील विविध प्रश्न, जनहिताचे मुद्दे आणि सकारात्मक घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा या दैनिकाचा उद्देश आहे. पत्रकारिता क्षेत्रात नवे व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने या दैनिकाची सुरुवात करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला समाजातील नामांकित डॉक्टर, राजकीय नेतृत्व, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, समितीचे वेगवेगळ्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष श्री काशिनाथ भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी समितीचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख श्री विकास गोरवाडकर यांनी सर्व मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी दक्षवेधचे कार्यकारी संपादक श्री गिरिजात्मज सारणीकर, सहाय्यक उपसंपादक (जालना) श्री शिवलाल लोखंडे, समितीचे मराठवाडा विभागातून श्री राजू शिंदे, विभागीय अध्यक्ष, श्री काशिनाथ भालेराव, विभागीय उपाध्यक्ष, श्री रमेश सुरशे, विभागीय उपाध्यक्ष, श्री जगन्नाथ घोडे, जालना जिल्हा सचिव, श्री अशोक म्हस्के, जालना जिल्हा उपाध्यक्ष, श्री ऋषिकेश सुरशे, छ. संभाजीनगर प्र. प्रमुख, श्री माधव काईतवाड, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष, श्री गौरव काळे यांनी कष्ट घेतले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link