कर्की गावातील बहुप्रतिक्षित रस्ता अखेर पूर्ण
मुक्ताईनगर प्रतिनिधी | प्रणित काठोके
कर्की गावातील श्री हरी नगर परिसरातील बहुप्रतिक्षित रस्ता बांधकाम अखेर पूर्ण झाले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या रस्त्याच्या पूर्णत्वामुळे स्थानिक रहिवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.
सदर रस्ता अंदाजे 7 मीटर लांबीचा असून सिमेंट काँक्रीट पद्धतीने बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात होणारी चिखलाची समस्या, खड्डे आणि वाहतुकीतील अडथळे आता दूर झाले आहेत. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनधारकांना या नव्या रस्त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
या कामासाठी श्री बाळु महाजन व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने निधी उपलब्ध करून देण्यात आला. कामाची गुणवत्ता टिकून राहावी यासाठी योग्य जल स्टॅन्ड व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानत परिसरातील इतर मूलभूत सुविधांकडेही लक्ष देण्याची मागणी केली आहे.








