एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हरताळा शिवारात पुन्हा बिबट्याची दहशत; गाईचे वासरू ठार

हरताळा शिवारात पुन्हा बिबट्याची दहशत; गाईचे वासरू ठार

मुक्ताईनगर प्रतिनिधी प्रणित काठोके

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गट क्रमांक ६६ मधील शेतकरी अशोक बालचंद्र धबाडे यांच्या मालकीच्या शेतात घुसून बिबट्याने बांधलेल्या गाईच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली.

माहितीनुसार, जंगलालगत असलेल्या शेतात वासरू बांधलेला असताना बिबट्याने अचानक झडप घातली. रात्रीच्या वेळी जनावरांच्या आरडाओरडाचा आवाज ऐकून शेतकरी घटनास्थळी धावले; मात्र तोपर्यंत वासराचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पाहणीनंतर हा हल्ला बिबट्याने केल्याची खात्री करण्यात आली असून परिसरात हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्क राहावे, रात्री जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत व एकट्याने बाहेर पडू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

दरम्यान, गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप काळे यांनी जिल्हा वनसंरक्षक राम धोत्रे यांच्याशी संपर्क साधून तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे हरताळा परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link