एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जनहितार्थ पाठपुरावा: ॲड. प्रसन्नदादा जगताप आणि सौ. वृषाली आनंद रिठे यांच्या प्रयत्नाने सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे यशस्वी पुनर्विलियन

जनहितार्थ पाठपुरावा: ॲड. प्रसन्नदादा जगताप आणि सौ. वृषाली आनंद रिठे यांच्या प्रयत्नाने सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे यशस्वी पुनर्विलियन

प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा

प्रभाग २८ मधील नागरिकांच्या सुविधेसाठी पुणे मनपाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यंतरी प्रशासकीय बदलांमुळे टिळक रोड ते पर्वती हा भाग विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाला जोडण्यात आला होता. मात्र, यामुळे जनता वसाहत, दांडेकर पूल, पानमळा, दत्तवाडी आणि गणेश मळा, नवशा मारुती परिसरातील सर्व नागरिक, जुना जकात नाका परिसरातील तसेच गणपती मंदीर सिंहगडरोड त्याच बरोबर रामकृष्ण मठ या सर्व परिसरातील नागरिकांना शासकीय कामांसाठी लांब जावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन ॲड. प्रसन्नदादा जगताप आणि सौ. वृषाली आनंद रिठे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

यासाठी अनेक निवेदने देऊन ॲड. प्रसन्नदादा जगताप यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. आता हा भाग पुन्हा गोयल गंगा, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाशी जोडण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची कामे स्थानिक पातळीवर जलद गतीने होतील आणि वेळ व श्रमाची बचत होईल. लोकहितासाठी दिलेल्या या लढ्याला यश आल्याने परिसरातील सर्व नागरिकांनी ॲड. प्रसन्नदादा जगताप यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link