प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी
दिनांक २२/०६/२०२६ रोजी रात्री भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि श्री. ताटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मौजे वेळे ता. वाई गावचे हद्दित करुणा मंदिरचे समोरील बाजुस, पुणे ते सातारा हायवे रोडचे पूर्व बाजुला झाडीमध्ये अंधारात पाच लोक त्यांची इरटिगा कार हायवे रोडचे बाजुला लावून बसले असुन ते हायवे रोडलगत असणारे पेट्रोलपंपवरील कामगारांना लुटणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने सपोनि श्री. ताटे यांनी तात्काळ श्री. तुषार दोषी, भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीम. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बाई विभाग यांना माहिती दिली. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयीतांना ताब्यात घेवून त्यांच्ळ्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे सपोनि श्री. पृथ्वीराज ताटे तसेच सफी. शिंदे, पो.कॉ. सपकाळ, पो.हवा कदम व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी साध्या वेशात मिळाले माहितीचे ठिकाणी जावून खात्री केली. त्यानंतर सोबतच्या पथकासह सापळा लावुन रात्री ०३.१५ वाजणेचे सुमारास अंधारात बसलेल्या दरोडयाच्या तयारीत असलेल्या ४ संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचे सोबत असलेला पाचवा साथीदार अंधाराचा फायदा घेवुन पळून गेला. परंतु ताब्यात घेतलेल्या संशयीतांकडे विचारपूस केली असता ते पुणे जिल्हयातील खेडशिवापूर येथून येवून हाथवे रोडलगत असलेले पेट्रोलपंपावरील कामगारांचे पैसे लुटण्याची तयारी करणेसाठी तेथे थांबले असल्याचे त्यांनी सांगीतले. पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये दोन कोयते, एक कटावणी, मिरची पूड, ३मोबाईल तसेच इरटिगा कार असे एकूण १० लाख ५२ हजार रुपयाचे किंमतीचे साहित्य मिळुन आले आहे. याबाबत भुईज पोलीस ठाणे गु.र.नं ४२/२०२६ भारतीय न्याय संहिता २००३ चे कलम ३१०(४), शस्व अधिनियम कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असुन पाहीजे असलेल्या पाचव्या आरोपीचा शोध सुरु आहे. सदर आरोपीकडून मेढा भागातील डीपी चोरी गुन्हा उघडकीस आला असून आणखीन डी.पी चोरी, घरफोडी, डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
मा.श्री. तुषार दोषी, भापोसे पोलीस अधीक्षक सातारा, श्रीम. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री.सुनिल साळुंखे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई, यांचे मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि श्री. ताटे,
पो.उप-नि.पतंग पाटील, पो.उपनि सुरज शिंदे, सहा.पो.उपनि दत्तात्रय शिंदे व पोलीस अंमलदार सुशांत धुमाळ, नितीन जाधव, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर, अजय सपकाळ, अभिजीत वाघमळे यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. कामगिरी बाबत मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा.अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी भुईज पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे. सागर विलास पवार मुळ रा. कुडाळ ता. जावली सध्या रा. कात्रज पूणे








