एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पारोळ्यात शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्याचा जल्लोष; शिवशंभु प्रतिष्ठानकडून सामाजिक प्रबोधन..

पारोळ्यात शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्याचा जल्लोष; शिवशंभु प्रतिष्ठानकडून सामाजिक प्रबोधन..

अष्टप्रधान मंडळाची ओळख आणि ज्वलंत विषयांवरील जनजागृती ठरली आकर्षणाचे केंद्र

जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

पारोळा येथील छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पारोळा तालुका सदस्यांच्या वतीने यावर्षीही सार्वजनिक शिवजन्मोत्सव पालखी सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. केवळ उत्सवी स्वरूप न ठेवता, प्रतिष्ठानने या सोहळ्याच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर प्रभावी ‘जनजागृती संदेश’ दिल्याने या उपक्रमाचे शहरभर कौतुक होत आहे.

*मध्यरात्री महादुग्धअभिषेकाने जन्मोत्सवाचा प्रारंभ*
शिवजन्मोत्सवाच्या सोहळ्याची सुरुवात १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता शिवतीर्थ येथे अत्यंत भक्तीमय वातावरणात झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ‘महादुग्धअभिषेक’ घालण्यात आला. पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार साहेब यांच्या हस्ते महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी शहरातील नगरसेवक मंडळी व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुग्धअभिषेकानंतर भव्य फटकेबाजी करून मोठ्या जल्लोषात शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

*संदेश फलकांनी वेधले लक्ष*
पालखी सोहळ्याच्यात प्रतिष्ठानतर्फे हिंदू धर्म जनजागृती, लव्ह जिहाद, लँड जिहाद यांसारख्या विषयांसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची माहिती देणारे बॅनर प्रदर्शित करण्यात आले होते. यात प्रामुख्याने वाहतूक नियम, पोलीस प्रशासनास सहकार्य, व्यसनमुक्ती आणि महिला व तरुणींच्या सुरक्षिततेसाठी ‘दामिनी पथका’ची जनजागृती करण्यात आली. या प्रबोधनात्मक संदेशांची नागरिकांनी प्रशंसा करत, हे संदेश काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

स्वराज्याचा इतिहास उलगडला
यावर्षी प्रतिष्ठानने ‘अष्टप्रधान मंडळा’तील मावळ्यांची ओळख करून देणारे पोस्टर्स शहरातील पथदिव्यांवर लावून अभिनव उपक्रम राबविला. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त शिवतीर्थावर लावलेल्या ‘रौद्रशंभो’ रूपातील बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले, अनेक शिवभक्तांनी आपल्या मोबाईलमध्ये याचे फोटो टिपले.

मान्यवरांची उपस्थिती
श्रीराम मंदिरापासून प्रारंभ झालेल्या या पालखी सोहळ्यास आमदार अमोल चिमणराव पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपनगराध्यक्ष रोहन मोरे, गटनेते अमृत चौधरी, नगरसेवक दीपक अनुष्ठान, अमोल शिरोळे, भूषण टिपरे, आशिष शिरोळे, मनीष पाटील, विवेक पाटील, नगरसेविका सौ. किरण पाटील, मंगलबाई चौधरी यांच्यासह असंख्य शिवभक्त व शिवकन्या उपस्थित होत्या.

शिवतीर्थावर सांगता
बाजारपेठ मार्गे ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या पालखीची सांगता शिवतीर्थ येथे झाली. आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. यावेळी पोलीस प्रशासन व ‘शिव साऊंड’चे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link