एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश

आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश
==================
*आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका च्या पार्श्वभूमीवर प्रशासक म्हणून सरपंचांची निवड करा अशी मागणी केली होती*
===================
*प्रशासक म्हणून सरपंच, पाहणार ग्रामपंचायतचा कारभार*
=================
*मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री यांच्या निर्णयाचे स्वागत करतानाच आमदार बबनराव लोणीकर यांचे अनेक सरपंचांनी मानले आभार*
==================
प्रतिनिधी नामदेव मंडपे मंठा
=====.=================
राज्यासह जालना जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या मुदत संपल्या होत्या व निवडणूक जाहीर न झाल्यामुळे ग्रामपंचायत वर प्रशासक नेमणे गरजेचे होते या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र लिहून तसेच प्रत्यक्षात भेट घेऊन मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून कार्यभार पाहण्याची संधी सरपंच व त्यांच्या बॉडीला द्यावी अशा प्रकारची मागणी केली होती या मागणीला यश आले असून निवडणुका जाहीर होईपर्यंत प्रशासक म्हणून सरपंच काम पाहणारा असून त्यासमवेतच उपसरपंच व बॉडीतील सदस्य त्यांना करण्यात येणार असल्याचा महाराष्ट्र सरकारने आदेश काढलेला असून यामुळे प्रशासकीय पातळीवरील अधिकारी ग्रामपंचायतचे प्रशासक म्हणून काम पाहणार नसून सरपंच व त्यांची बॉडी काम पाहणार असल्यामुळे ग्राम विकासाला खऱ्या अर्थाने निवडणुका जाहीर होईपर्यंत कुठलीही बाधा येणार नसून या मुळे सरकारने घेतलेले सर्व निर्णय यांची अंमलबजावणी ग्रामस्थरावर सरपंच करणार असल्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतचे सरपंच व उपसरपंच तसेच सदस्य यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे आभार मानले असून या मुळे ग्रामविकास करत असताना प्रशासक म्हणून प्रशासकीय अधिकारी यांचा लाल फितीचा कारभार नेहमीच आडवा आलेला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावगाड्यातील नागरिका म समवेत काम करण्याचा अनुभव नसतो मात्र ग्रामपंचायत म्हणून सरपंचांना गावातील प्रत्येक घटकाचा तंतोतंत अभ्यास असतो या पार्श्वभूमीवर हा निर्णय अतिशय महत्त्वाचा असून खऱ्या अर्थाने जनविकासाच्या कामाला अडथळा येणार नसल्याचे अनेक सरपंचांनी सांगितले आहे
===================
याबाबत सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी आमदार बबनराव लोणीकर यांचे आभार मानले असून, मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे
तर खांडवी वाडी चे सरपंच रमेश भापकर आमदार लोणीकरांचे आभार मानत आमदार लोणीकर हे सदैव ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले नेते असल्याचे म्हटले आहे
तर श्रीष्टि गावचे सरपंच किरण अंभोरे यांनी आमदार लोणीकरांचे आभार मानताना ग्रामविकासासाठी हा निर्णय अतिशय योग्य असल्याचे म्हटले आहे
तर आष्टी गावच्या सरपंच शोभा चंद्रकांत मोरे यांनी मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आमदार लोणीकरांच्या प्रयत्नामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगितले
लोणी गावचे सरपंच गजानन लोणीकर यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रशासक म्हणून सरपंचांना संधी दिल्यामुळे गावातील विकास कामातील अडथळे दूर होणार असल्याचे सांगितले
याबाबत अकोली च्या सरपंच पल्लवी ज्ञानेश्वर सोळंके यांनी या निर्णयाचे स्वागत करताना लोणीकर हे नेहमीच ग्राम स्तरावरील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीत पाठीशी उभे राहणारे नेतृत्व असून त्यांच्यामुळेच पुढील निवडणुकीपर्यंत काम करण्याची संधी आम्हाला मिळणार असल्याचे प्रसिद्धी पत्रका द्वारे म्हटले आहे तर मंठा तालुक्यातील देवठाणा येथील सरपंच निलावती गणेशराव मोरे यांनी लोणीकरांचे आभार मानताना निवडणुकापर्यंत काम करण्याची संधी मिळाल्याचे समाधान व्यक्त केले
वाघाळा येथील सरपंच सुनील कांगणे यांनी या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने ग्रामविकासातील अडथळे प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्याकडेच काम राहिल्याने येणार नसल्याचे सांगितले

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link