एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

परीक्षे दरम्यान पर्यवेक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका.

नरसिंह विद्यामंदिर उमरदरी केंद्राच्या कॉफी प्रकरणामुळे काॅपी मुक्ती अभियानास गालबोट लागले.

परीक्षे दरम्यान पर्यवेक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांचा दणका.

नांदेड संपादक सखाराम कुलकर्णी

नांदेड- नरसिंह विद्यामंदिर उमरदरी ता. मुखेड परिक्षा केंद्रावर बारावी परीक्षे दरम्यान केंद्रावरील नऊ पर्यवेक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे व विद्यार्थ्यांना तपासून हॉलमध्ये सोडणारे सदरील शाळेचे चार कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे शिक्षणाधिकारी माध्य. नांदेड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला.

नरसिंह विद्या मंदिर ता. मुखेड हे केंद्र मास कॉफीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असून कॉप्या करता येतात म्हणूनच या शाळेत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेश घेतात. शाळेतील व्यवस्थापनाने कॉपी करण्यास विद्यार्थ्यांकडून 15 ते 20 हजार रुपये जमा केले. त्यामुळे 2026 च्या परीक्षेचे या केंद्राला मान्यता देऊ नये असे लेखी निवेदन सदरील शाळेच्या संस्थेचे आजीव सभासद सखाराम कुलकर्णी यांनी परीक्षा मंडळ लातूर व जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले होते. भौतिकशास्त्राच्या परीक्षेच्या दिवशी दिलीप कुमार बनसोडे शिक्षणाधिकारी (योजना) यांनी या केंद्राला भेट दिली असता कॉपी करताना दोन विद्यार्थी आढळून आले व बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खिशात गाईडची पानं आढळून आलीत. या केंद्रावरील पर्यवेक्षक कर्तव्यात कसूर करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. जिल्हादक्षता समितीने वारंवार आवाहन करून देखील पर्यवेक्षकांनी गैरप्रकाराला आळा घातला नाही.या केंद्रामुळे जिल्ह्याच्या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेस नाहक गालबोट लागले. परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षार्थींना तपासून आत सोडणारे जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माजी सचिव निलाबाई शिंदे, शिक्षक टी. एस. वननाळे, आर. जी. गलांडे, प्राचार्य एस. पी. देशपांडे यांनी पारदर्शकपणे परीक्षार्थींची तपासणी केली नाही. तसेच पर्यवेक्षकांनी देखील त्यांना नेमून दिलेल्या पर्यवेक्षणीय कामात हयगयीने व बेजबाबदारपणाने वागले. परीक्षा केंद्रावरील सीसी टीव्ही बंद ठेवले. सीसीटीव्ही केवळ वर्ग खोल्यात लावण्यात आले. केंद्र संचालक बिल्लेवाड डी.एस. हे पण बेजबाबदार असल्याचे तपासणीला गेलेले श्री बनसोडे यांच्या निदर्शनास आले. श्री बनसोडे यांनी दिलेल्या अहवालावरून माधव सलगर शिक्षणाधिकारी माध्य. यांनी पर्यवेक्षक पदावर असलेले ए.पी. मुगटकर, एस. सी. वाघमारे, व्ही एच.खंदारे, एस. के. क्षीरसागर, जी.ए. गाडले, एल.एच. पाटील, श्रीमती पी. व्ही. लोहाळे, आर. आर. बिरादार व जी.बी. भरडे यांचे सह परीक्षार्थीयांची तपासणी करून सोडणारे श्रीमती निलाबाई शिंदे,डी.एस. वननाळे, आर.जी. गलांडे प्राचार्या एस. पी. देशपांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यांचे वागणे संशयास्पद असून परीक्षा नियमावलीला धरून नाही. कॉफी मुक्ती अभियान राबवण्याकडे दुर्लक्ष केले. बैठे पथक मध्ये असलेले एस. एस. मामीडवार ,नायब तहसीलदार मुखेड, आय. ए. सय्यद मंडळ महसूल अधिकारी, एन.जि. चिंचोरे,मद्देवाड एन. एल. कृषी सहाय्यक यांनी देखील कामात अत्यंत गंभीर चुका केल्या.दिलेल्या सूचनानुसार झूम वेबकास्ट ऑनलाईन शूटिंग प्रणालीवर संबंधित बैठे पथक सदस्य हजर नव्हतेच. यांचे विरुद्धही प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश या नोटीस द्वारे दिले. हि कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवण्यात आला की संबंधित बैठे पथकातील सर्व सदस्य, तपासणी करणारे सर्व सदस्य व संबंधित पर्यवेक्षकांनी स्पष्ट लेखी स्वरूपात आपले म्हणणे नोटीस मिळताच तीन दिवसाच्या आत समक्ष सादर करावे.परीक्षेत कॉप्या करण्यास अडथळा येऊ नये म्हणुन कडक व शिस्तप्रिय असलेले ओमप्रकाश कल्याणकर यांना शिवाजी जाधव यांच्या भ्रष्ट व्यवस्थापनाने मुख्याध्यापक पदावरून हाटवले. त्यामुळेच परीक्षेत गैर प्रकार होत आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटिशीला समाधान कारक खुलासा न आल्यास परीक्षा नियमावलीनुसार कायदेशीर, प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. या नोटिसीमुळे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड काय दणका देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link