कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या फरार असणाऱ्या आरोपींच्या अखेर चंदननगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
(पुणे शहर) शुभांगी सरोदे-पुरीगोसावी प्रतिनिधी.
चंदननगर पोलीस ठाणेचा नव्याने पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या धडक कारवाईला चांगलीच सुरुवात झाली असून चंदननगर परिसरांत आता अवैध धंदे तसेच गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. चंदननगर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधील गुंतवणीतून गुंतवणुकीतून चांगलाच फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी व इतर सहकारी यांची फसवणूक झाल्याची तक्रार चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल होती. यामध्ये सप्टेंबर 2021 ते 31/10/ 2023 या कालावधीत 3,39,12,637/रूपयांची आर्थिक फसवणूक केलेल्या गुन्ह्यातील आरोपींस अखेर चंदननगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी भरत सोपान पठारे हा नाशिक भागात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाथर्डी फाटा नाशिक येथे ताब्यात घेतले असून सदर आरोपीं हा. (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999) चे कलम 3व 4 या गुन्ह्यांमध्ये दिनांक 19 /02 /2026 रोजी अटक करण्यात आली होती सदर आरोपी हा शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांची फसवणूक करून मागील 3 वर्षापासून फरार होता. भारत सोपान पठारे (वय 30) रा. नाऊरगांव ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर) असे आरोपींचे नाव आहे. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेशकुमार सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त सोमय मुंडे पोलीस उप आयुक्त परिमंडळ -7 प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळवे पोलीस हवा. गुरव पोलीस हवा. घावरे पोलीस हवा. घाडगे पोलीस अंमलदार बेंद्रे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.*








