एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जुगारा मधून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन इसमांवर दहशतवाद विरोधी पथक व शिक्रापूर पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई

*मौजे केंदूर ता.शिरूर जि. पुणे येथे बेकायदेशीर ऑनलाइन फनगेम सारख्या जुगारा मधून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोन इसमांवर दहशतवाद विरोधी पथक व शिक्रापूर पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई

प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी

दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ मौजे केंदूर ता.शिरूर जि.पुणे
इसमनामे १)अमोल जयसिंग साकोरे वय ३२ रा.शिळकवाडी केंदूर ता.शिरूर जि.पुणे२)अक्षय रघुनाथ साकोरे वय २५ रा.शिळकवाडी केंदूर ता.शिरूर जि. पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून
३,८३,५००/- किमतीचा मुद्यमान जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांनी दिली.
दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकासह शिक्रापूर पोलीस स्टेशन परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केंदुर ह्या ठिकाणी फण गेम नावाचा online जुगार सारख्या खेळातून लाखो रुपयांची फसवणूक करत असल्याची अशी माहिती मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीवरून पथकाने शिक्रापूर पोलीस स्टेशन यांच्या स्टाफसह मौजे केंदूर येथून वरील दोन संशयित इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १५३५०० रोख रक्कम व ५ मोबाईल हँडसेट असा एकूण ३८३५००/- किमतीचा मुदेमाल ताब्यात घेण्यात असला असून सदर आरोपींवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण , रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम,विशाल भोरडे,ओंकार शिंदे,गणेश चंदनशिव, शिक्रापूर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर,रोहिदास पारखे, पोलीस शिपाई विशाल देशमुख यांचे पथकाने केली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर हे करीत आहे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link