एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ईश्वरपूर : शिराळा नाका परिसरात पोलिसांनी पान टपऱ्यावर केलेली कारवाई.

ईश्वरपूरात २० ते २५ पानटपऱ्यांवर दंडात्मक कारवाई
तंबाखूजन्य पदार्थ, मावा-गुटखा विक्रीवर पोलिसांची धडक मोहीम

: ईश्वरपूर : शिराळा नाका परिसरात पोलिसांनी पान टपऱ्यावर केलेली कारवाई.

ईश्वरपूर : प्रतिनिधी रणजीत मस्के

ईश्वरपूर येथे तंबाखूजन्य पदार्थ, मावा व गुटखा विक्री करणाऱ्या २० ते २५ पानटपऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्या आदेशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत वारके, हवालदार जितेंद्र थोरात, कॉन्स्टेबल दीपक गस्ते, महिला पोलीस साळुंखे तसेच निर्भय पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. शहरातील विविध भागांत अचानक तपासणी करून परवाना नसताना किंवा नियमांचे उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी संबंधित टपरीधारकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने तसेच तरुण पिढीमध्ये वाढत्या तंबाखू सेवनाला आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा देत नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link