वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
अमोल येसनकर
आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 (मंगळवार)रोजी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, वर्धा जिल्हातर्फे जिल्हाध्यक्ष तुषार रेड्डीवार यांच्या नेतृत्वाखाली वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष आर्यन कांबळे, सचिव अमित भोसले, संपर्कप्रमुख आशिष जाचक, सहसचिव अमोल ठाकरे, देवळी तालुकाध्यक्ष अमोल येसनकर तसेच ज्येष्ठ पत्रकार अब्दुल कादिर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौरभ कुमार अग्रवाल यांच्या कार्यकुशल नेतृत्वाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
तसेच गुन्हेगारी नियंत्रण, जनजागृती उपक्रम राबविणे आणि नागरिकांशी संवाद वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत असून, त्यामुळे जिल्ह्यात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाल्याची नागरिकांची प्रतिक्रिया आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळातही जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होत राहो, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








