एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक : महापौर गाडे 

छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक : महापौर गाडे .

प्रतिनिधी -सारंग महाजन.

‘स्नेहबंध’तर्फे ‘शिवजयंती’ निमित्त आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

अहिल्यानगर – छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ व्या शतकात आपले शौर्य, लष्करी डावपेच आणि कौशल्य दाखवले असले तरी, त्यांचे जीवन आजही आपल्याला आपले राष्ट्र मजबूत करण्यासाठी प्रेरणा देते. छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन अहिल्यानगरचे नवनिर्वाचित महापौर ज्योती गाडे यांनी केले. स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उद्योजक अमोल गाडे, स्नेहबंधचे संस्थापक डॉ. उद्धव शिंदे, माजी प्राचार्य एकनाथ जगताप, स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे, सचिन पेंडुरकर, बालाजी वल्लाल, गणेश डेलमाडे, स्वयंम बास्कर आदी उपस्थित होते.
महापौर गाडे म्हणाल्या, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नसून शौर्य, समता, प्रेरणा आणि आस्थेचे केंद्र आहे. स्वराज्य स्थापनेपासून आजपर्यंत महाराष्ट्राचे राजकारण आणि सत्ता हे छत्रपती शिवाजींच्या नावानेच सुरू असलेले पाहायला मिळते. तुमच्या मुलांना देखील तु्म्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याची ओळख करून दिली पाहिजे. स्नेहबंध फाउंडेशन सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रात चांगले काम करत आहे. ते दरवर्षी शिवजयंती निमित्त निबंध स्पर्धा घेण्याचा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत.
डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य कळावे, त्यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने दरवर्षी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. प्रास्ताविक माजी प्राचार्य एकनाथ जगताप यांनी केले.

निबंध स्पर्धेतील विजेते
प्रथम :  खुशी आदमाने (इ.७ वी, कै. दामोधर विधाते विद्यालय, सारसनगर), द्वितीय : वैष्णवी खंदारे (इ. ९ वी, केशवराव गाडीलकर हायस्कूल, वाघ मळा), तृतीय : अनुष्का गोरखे (इ.८ वी, श्रीमती अॅबट मायादेवी हायस्कुल, भिंगार), उत्तेजनार्थ : सुप्रिया राजापुरे (इ.७ वी, महर्षी ग.ज. चितांबर विद्या मंदीर, सबजेल चौक), सोहम देलमाडे (इ. ९ वी, श्री. समर्थ विद्या मंदीर प्रशाला, सावेडी). सहभाग : समृध्दी पांगरे (इ.८ वी, जय बजरंग माध्यमिक विद्यालय, सावेडी), अवनिश वल्लाल (इ.८ वी, ज्ञानसंपदा इंग्लिश मिडीयम स्कूल), प्रथमेश सत्रे (इ.७ वी, स्वा.सैनिक जानकी कवडे

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link