एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एस पी एम च्या संघाला अभिवाचन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

एस पी एम च्या संघाला अभिवाचन स्पर्धेत द्वितीय पारितोषिक

प्रतिनिधी सारंग महाजन

रंगगंध कलासक्त न्यास , चाळीसगाव यांच्या जागतिक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेची बुलढाणा जिल्ह्याची प्राथमिक फेरी चिखली येथे शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी मोठया उत्साहात संपन्न झाली.भवताल थिएटर , चिखली यांच्या सहयोगाने
आयोजित या खुल्या पुरुषोत्तम दारव्हेकर अभिवाचन स्पर्धेत बाह्यपरिक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, कवि दा. गो. काळे व स्थानिक परिक्षक म्हणून प्रसिद्ध नाटककार , लेखक अमोल कुळकर्णी हे उपस्थित होते.
या स्पर्धेत व्दितीय पारितोषिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या तात्यासाहेब महाजन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने पटकावले. डॉ.केदार ठोसर दिग्दर्शित, ‘उखळाचे घर’ या दीर्घ कवितेचे अभिवाचन कॉलेज कट्टा या समुह नावाने करण्यात आले. कु. शर्वरी कुळकर्णी ह्या संघप्रमुखासह कु. जान्हवी तेल्हारकर , कु. रेणुका दुंडयार , कु. लक्ष्मी शिंदे या चार विद्यार्थीनींनी प्रभावी अभिवाचन केले. एसपीएम महाविद्यालयाला दुहेरी सन्मान प्राप्त झाला. १८ ते ३० वयोगटातील स्पर्धकांमधून उदयोन्मुख रंगतारा पारितोषिक जान्हवी तेल्हारकर या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आले.
या खुल्या अभिवाचन स्पर्धेतील उज्ज्वल यशाबद्दल, स्पर्धक समूह आणि दिग्दर्शक यांचे शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराजजी भाला आणि सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य डॉ. सुभाष गव्हाणे यांनी हार्दिक अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link