भवताल थिएटर , चिखली आणि रंगगंध कलासक्त न्यास , चाळीसगाव यांच्या जागतीक मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेची बुलढाणा जिल्ह्याची प्राथमिक फेरी.
प्रतिनिधी- सारंग महाजन.
चिखली येथील एस. पि. एम. महाविद्याल ।यात काल दि -14 फेब्रु2026 शनिवारी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला एस. पि. एम.महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गव्हाने सर , स्व. सु. रा. चु. आयुर्वेद महाविदयालयाचे प्राचार्या सौ गुल्हाने मॅडम, बाह्यपरिक्षक जेष्ट साहित्यिक, कवि श्री दा. गो. काळे व स्थानिक परिक्षक प्रसिद्ध नाटककार , लेखक श्री अमोल कुळकर्णी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
एकुण 8 संघांनी या स्पर्धेत भाग घेतला.प्रथम क्रमांक काव्यानंद समुह चिखली , यांना अजिंठा या दिर्घ कविता अभिवाचनाला प्राप्त झाला. संघ प्रमुख सौ वैदेही आसोलकर आणि त्यांच्यासोबत विनय शुक्ल यांनी अभिवाचन केले.
व्दितिय क्रमांक उखळाचे घर या दिर्घ कविता अभिवाचनाला प्राप्त झाले. कॉलेज कट्टा या समुहाने हे अभिवाचन केले कु. शर्वरी कुलकर्णी ह्या संघप्रमुखा सोबत जान्हवी तेल्हारकर , रेणुका दुंडियार , लक्ष्मी शिंदे या समुहात अभिवाचनाला होत्या.
तृतिय कमांक शब्दसुगी घ्या समुहाला मिळाला. सौ. सुवर्णा कुळकर्णी या संघप्रमुखा सोबत अमोल चांगाडे यांनी कवितेचे अभिवाचन केले.
उदयोन्मुख रंगतारा पारितोषीक जान्हवी तेल्हारकर यांना उखळाचे घर या दिर्घ कवितेच्या अभिवाचना साठी देण्यात आले.
अंतिम फेरीसाठी काव्यानंद समुहाला चाळीसगावला आमंत्रित करण्यात आले आहे.
परिक्षक- श्री . दा. गो. काळे (9421467640)
श्री . अमोल कुळकर्णी(9421463645)








