एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अखेर जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संस्थेच्या 11 शाळातील सन 2012 नंतर झालेल्या नियुक्त्यांची चौकशी शिक्षण संचालक पुणे करणार

अखेर जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संस्थेच्या 11 शाळातील सन 2012 नंतर झालेल्या नियुक्त्यांची चौकशी शिक्षण संचालक पुणे करणार

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सखाराम कुलकर्णी

सर्व प्रस्ताव दाखल करण्याचे संचालकांचे आदेश* नांदेड- जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेड संस्थेच्या 11 शाळातील गैर कारभाराच्या जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सन 2012 ते 2025 पर्यंत नियुक्त केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रकरणात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी दस्तऐवज व प्रस्ताव संचालक पुणे कार्यालयात दि. 18 फेब्रुवारीला दाखल करण्याचे आदेश डॉ. महेश पालकर शिक्षण संचालक पुणे यांनी शिक्षणाधिकारी नांदेड व शिक्षण उपसंचालक लातूर यांना दिले. ह्या आदेशामुळे शिक्षण विभागात व शिक्षकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संस्थेच्या नांदेड जिल्ह्य़ातील तीन प्राथमिक, तीन माध्यमिक व तीन उच्च माध्यमिक शाळा तसेच छत्रपती संभाजीनगर येथील एक प्राथमिक व एक माध्यमिक शाळेत सन 2012 नंतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची झालेली नियुक्ती त्यांच्या वैयक्तिक मान्यता शालार्थ आयडी प्रकरणात प्रचंड गैरकारभार व अनियमितता झाल्याची तक्रार जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी सन 2019-20 पासून करत होते. या गैर व नियमबाह्य कारभारात शिक्षण विभाग नांदेड व शिक्षण उपसंचालक विभाग लातूरचे अधिकारी सहभागी असल्यामुळे गैरकारभार केलेल्या अधिकाऱ्याकडून गैरकारभाराची चौकशी करू नये अशी मागणी सखाराम कुलकर्णी शासन दरबारी व शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक पुणे यांचेकडे करत होते. तरी गैरकारभार केलेले तत्कालीन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सन 2022 ला सर्व शाळांची चौकशी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजी जाधव यांचे जवळ बसून केली व कुळकर्णी यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे अहवालात नमूद केले. व आपला गैर कारभार व भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न केला. या अहवालावर कुलकर्णी यांनी सचिव शालेय शिक्षण मुंबई ,व शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे आक्षेप घेऊन उच्च स्तरावर पारदर्शक चौकशी होण्यास संचालक कार्यालयातच चौकशी करावी अशी मागणी केली. पण संचालक कार्यालयातील ही काही अधिकारी झारीतले शुक्राचार्य असल्यामुळे चौकशी होतच नव्हती. शेवटी सखाराम कुलकर्णी यांनी दि. 12 फेब्रुवारी रोजी शिक्षण आयुक्त सचिनवर सचिंद्र प्रताप सिंह यांची भेट घेऊन सत्यप्रकार पुराव्यासह सांगून दाखल केला. बनावट ठराव, 20 टक्के शालार्थ आय डी असताना 100 टक्के वेतन देण्यात येते, लाखाने मागील थकबाकी काढणे यावर दोन तास चर्चा झाल्यावर व संचालकांचा दिरंगाई व चालढकल पणा दिसल्यावर तसेच वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी प्रकरणात अनियमितता झाल्याचे लक्षात आल्यावर आयुक्तांनी सदरील प्रकरणी संचालक कार्यालया कडून चौकशी करण्यास शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांना सांगितले. ह्या आदेशानंतर डॉ. महेश पालकर शिक्षण संचालक पुणे यांनी शिक्षणाधिकारी नांदेड व शिक्षण उपसंचालक लातूर यांना आदेश काढून मुद्देसूत सूचना दिल्या. त्यात त्यांनी सन 2012 ते 2025 पर्यंत झालेल्या वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव, शंभर टक्के व वीस टक्के अनुदानाचे आदेश, संस्थेचे कार्यकारी मंडळाची माहिती, विनाअनुदानित वरून अनुदानित पदावर बदल्या केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव व इतर सर्व दस्तऐवज घेऊन दि. 18 फेब्रुवारी रोजी शिक्षणाधिकारी नांदेड व शिक्षण उपसंचालक लातूर यांनी हजर होण्याचे आदेश दि. 13 फेब्रुवारीला निर्गमित केले. ह्या आदेशामुळे शिक्षण विभागात तसेच शाळेतील शिक्षकांमध्ये घबराटीचे वातावरण होऊन प्रस्तावाची सारवा -सारवी करण्यास सुरुवात झाली. आता दि. 18 तारखेला काय चौकशी होईल व कोण दोषी सापडेल व किती जणांना घरी जावे लागते याची चर्चा शिक्षण विभागात होत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link