थेपडे विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
म्हसावद येथे थेपडे विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचां निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कार्यक्रमात अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जी.डी.बच्छाव सर , उप-मुख्याध्यापक श्री.एस.के.भंगाळे सर पर्यवेक्षक श्री के.पी.पाटील सर, तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री.पी.ए.महाजन सर, सौ.ए.डी. नेवे मॅडम, शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण सर, जुनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री वाय.पी.चिंचोरे सर, सर्व ज्येष्ठ शिक्षक व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, व शालेय शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कु.हर्षदा धनगर व कु.निकिता चौधरी या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजन व नंतर विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना म्हटली. प्रास्ताविक पर भाषण उपमुख्याध्यापक श्री.एस.के.भंगाळे सर यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या परीक्षा पद्धती विषयी मार्गदर्शन केले. तसेच परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांनी तणावमुक्त कसे राहावे व आपला आहार व आरोग्य कसे सांभाळावे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपल्या गुरुजनांविषयीचा आदर आपल्या भाषणातून व्यक्त केला. अध्यक्ष भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.जी.डी.बच्छाव सर यांनी विद्यार्थ्यांनी बदललेल्या परीक्षा पद्धतीची भीती न बाळगता तणावमुक्त अभ्यास करावा. तसेच शाळेत सोडविण्यात आलेल्या 49 प्रश्नपत्रिकांच्या आपल्याला परीक्षेत कसा फायदा होईल याविषयी सांगितले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.वृषाली पाटील या विद्यार्थिनीने केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला.








