एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य तयारी

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य तयारी
श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली जिल्ह्यातील महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्या कार्यक्रमाची तयारी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे अशी माहिती हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे
महाशिवरात्रीसाठी भव्य तयारी झाली असुन या ठिकाणी ५० लाख भाविकांच्या वर्षभरात आगमनाचा अंदाज औंढा नागनाथ मंदिर येथे येत्या महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असून सुमारे ५० लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येऊ शकतात, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.
महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात तसेच गावात ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता मोहीम आणि तात्पुरत्या शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. पावसाळा नसला तरी मोठ्या गर्दीमुळे साचणारे पाणी व अस्वच्छता टाळण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार असून हलक्या व जड वाहनांसाठी वेगवेगळे पार्किंग झोन निश्चित केले जाणार आहेत. एसटी बस व खासगी वाहनांसाठी नियोजित मार्ग आखण्यात येणार असून वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.
तसेच आरोग्य विभागाकडून तात्पुरती वैद्यकीय पथके, अॅम्ब्युलन्स सेवा आणि आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाशयोजना आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व अधिकृत सूचना पाळाव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link