एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

रक्षा मंत्री उत्कृष्टता पुरस्कारामुळे अहिल्यानगर छावणी परिषद शाळेच्या गुणवत्तेचा गौरव – डॉ. उद्धव शिंदे.

रक्षा मंत्री उत्कृष्टता पुरस्कारामुळे अहिल्यानगर छावणी परिषद शाळेच्या गुणवत्तेचा गौरव – डॉ. उद्धव शिंदे.

प्रतिनिधी -सारंग महाजन.

अहिल्यानगर : अहिल्यानगर छावणी परिषद शाळेला देशपातळीवरील रक्षा मंत्री उत्कृष्टता २०२५ हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या वतीने छावणी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी. सुनीलकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी, मनोनीत सदस्य वसंत राठोड व नीता राठोड यांना शाल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक संजय शिंदे, राजू भोसले, मुबीना सय्यद यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होता.
या प्रसंगी बोलताना डॉ. उद्धव शिंदे म्हणाले की, शाळेमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा, कला व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळेच हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान मिळाला आहे. संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान होणे ही अहिल्यानगरसाठी गौरवास्पद बाब आहे.
सीएसआर फंडाच्या माध्यमातून शाळेच्या इमारतींना आकर्षक स्वरूप देण्यात आले असून बोलक्या भिंती व रंगसंगतीमुळे शैक्षणिक वातावरण अधिक प्रेरणादायी झाले आहे. विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले असून बालवाटिका व पूर्व-प्राथमिक वर्गांच्या माध्यमातून शिक्षणाचा मजबूत पाया घालण्यात आला आहे.
डिजिटल क्लासरूम, संगणक कक्ष, ग्रंथालय, सुसज्ज क्रीडांगण, ऍस्ट्रॉनॉमी लॅब, परसबाग, स्काऊट-गाईड उपक्रम, विज्ञान प्रदर्शन तसेच संगीत व चित्रकलेतील विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पीएमश्री योजनेतून मिळालेल्या सुविधांमुळे शाळेचा सर्वांगीण विकास अधिक गतिमान झाला असल्याचेही डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link