एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आजही मैने संभाजी महाराज की पुस्तक पढी: अमित शहा

आजही मैने संभाजी महाराज की पुस्तक पढी: अमित शहा

संपादक संतोष लांडे

शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे आपण सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्वे आहेत. आजच आपण छत्रपती संभाजी महाराजांचे छावा हे पुस्तक वाचले असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. निमित्त होते वारजेतील शिवभक्त प्रतिष्ठानचे संस्थापक शिवभक्त अनिकेत जावळकर यांनी शहा यांना शिवाजी महाराजांचे पुस्तक नवी दिल्लीत भेट दिले. त्यावेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले.
यावेळी त्यांच्यासोबत अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने युवक राजकारणात येत असल्याचे अमित शहा यांनी नमूद केले. राजकारणात तरुणांचा सहभाग वाढल्यावर लोकशाही अजून बळकट होईल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. खासदार लंके यांनी अहिल्यानगर मधील तसेच गृह विभागाशी संबंधित मुद्यावर चर्चा केली.
अतिशय उत्कट भावना: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाली. त्यांच्या ऑफिसमधील वातावरण अतिशय भारदस्त, सुरक्षा व्यवस्था चोख हे पाहून आपण आधीच भारावून गेलो होते. त्यात अमित शहा यांनी खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. त्यांच्या दहा मिनिटांच्या भेटी पैकी निम्म्यापेक्षा जास्त वेळ आपणच बोलत होतो. तुम्ही नावापुढे शिवभक्त लावता मग तुम्ही भगवान शंकर शंकराचे भक्त आहात का? यावर अनिकेत जावळकर यांनी आपण छत्रपतींचे शिवभक्त असल्याचे सांगितले. एकूणच ही भेट आपल्या जीवनातील एक संस्मरणीय क्षण असल्याचे मत अनिकेत जावळकर यांनी व्यक्त केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link