एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

परतवाडा पोलीस स्टेशनची कामगिरी तुर चोरीचा गुन्हा केला उघड

परतवाडा पोलीस स्टेशनची कामगिरी तुर चोरीचा गुन्हा केला उघड

प्रतिनिधी रणजीत मस्के

पोलीस स्टेशन परतवाडा येथे दिनांक ३१/०१/२०२६ रोजी फिर्यादी पंकज सुरेशराव घोरे वय ३८ वर्ष, धंदा – शेती रा. ब्राम्हणसभा कॉलनी परतवाडा यांनी जबानी रिपोर्ट दिला की, दिनांक २९/०१/२०२६ चे २३/३० वा. ते दिनांक ३०/०१/२०२६ चे ०७/०० वा. दरम्यान फिर्यादीचे घरासमोरील ओटयावर ठेवलेले त्यांचे मालकीचे १४ तुरीचे पोते प्रत्येकी ३५ किलो वजनाचे असे एकुन ४९० किलो किंमत ४४,१०० रूपयाचे तुरीचे पोते कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेले आहे. अश्या फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून अपराध क्रमांक ७०/२०२६ कलम ३०३(२) भा. न्या.सं. प्रमाने गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

सदर गुन्हयातील आरोपी व मुद्देमाल शोधकामी पोलीस स्टेशन परतवाडा डि बी पथक रवाना होवुन माहीती घेत असता गुप्त बातमीदारा कडुन विश्वसनीस माहीती मिळाली की, सदर गुन्हयातील चोरी गेलेली १४ तुरीचे पोते प्रथमेश उर्फ गन्नु सुंदरलाल तकतवाले (चौधरी), वय २५ वर्ष, रा. ब्राम्हणसभा कॉलनी परतवाडा व आनंद विकास डायलकर वय २६ वर्ष रा. बोरगाव दोरी ता. अवलपुर या दोघांनी चोरी केले आहे. अश्या माहीतीचे आधारे त्या दोघांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन गुन्हया संबंधाने विचारपुस केली असता त्यांनी कबुली दिली की, त्या दोघांनी मिळून दिनांक ३१/०१/२०२६ रोजी चे रात्री दरम्यान सदर गुन्हयातील फिर्यादी यांचे घरासमोरील ओटयावरून १४ तुरीचे पोते एकुन ४९० किलोवे मोटर सायकलवर घेवुन जावुन एका ऑटोत टाकुन घेवुन गेले. सदर गुन्हयातील मु‌द्दे‌माल व चोरीत वापरलेले वाहन व ईतर साक्षीदारांचा शोध घेणे असल्याने नमुद आरोपीतांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली.

सदर गुन्हयातील अटक आरोपी नामे प्रथमेश उर्फ गन्नु सुंदरलाल तकतवाले (चौधरी), वय २५ वर्ष, रा. ब्राम्हणसभा कॉलनी परतवाडा याने कबुली जबाब दिला की, गुन्हयातील चोरी गेलेला मुद्देमाल तसेच गुन्हयात वापरलेला ऑटो व मोटर सायकल काढून देतो वरून दोन पंचासह आरोपीने सांगीतले प्रमाने राहुल ट्रेडींग अन्ड कंपनी पशु खादय भंडार येथुन ४६४ किलो तुर किंमत ३९,५०० रूपये जप्त करण्यात आली. तसेच गुन्हयात वापरलेला काळया, पिवळ्या रंगाचा तिन चाकी प्रवासी ऑटो MH 49 E 3385 क्रमांकाचा किंमत १,५०,००० रूपयाचा अंजनगाव स्टॉप वरील गणक ऑटो डील जवळून आरोपीचे सांगणेप्रमाने दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला. तसेच गुन्हयात वापरलेली होन्डा कंपनीची युनिकॉन काळया रंगाची मोटर सायकल विना कक्रमांकाची किंमत ७०,००० रूपयाची जिवा चेचीस क्रमांक ME4KC401GL048262 असा असलेली आरोपीने सांगीतल्याप्रमाने ब्राम्हणसभा कॉलनी परतवाडा येथील त्याचे राहते घरासमोरून दोन पंचासमक्ष जप्त केली. असा एकुन २,५९,५०० रूपयाचा मु‌द्देमाल मेमोरंडम पंचनामा प्रमाने जप्त करण्यात आला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, मा. सहायक पोलीस अधिक्षक उपविभाग अचलपुर डॉ. शुभम कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के ठाणेदार परतवाडा, स.पो.नि. सलीम शेख, पो.हे.कॉ. सचिन होले, पो. हे. कॉ. सुधिर राउत, पो.कॉ. विवेक ठाकरे, पो.कॉ. शुभम शर्मा, पो.कॉ. सचिन कोकणे, पो.कॉ. घनशाम किरोले, पो.कॉ. जितेश बाबील यांनी केली आहे.

सुरेश म्हस्के

ठाणेदार पोलीस स्टेशन परतवाडा

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link