एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

गांजा अंमली पदार्थाची विक्री करणा-या सराईत गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.

गांजा अंमली पदार्थाची विक्री करणा-या सराईत गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही.

वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 07 फेब्रुवारी 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकाने पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना गोपणीय माहिती मिळाली कि, स्वीपर कॉलनी महात्मा फुले वार्ड हिंगणघाट येथील सराईत गुन्हेगार प्रमोद छन्नु सांडेकर हा गांजाविक्री चा अवैध व्यवसाय करीत असुन, तो त्याचेजवळील मोटर सायकल नी गांजा चा माल घेवुन, हिंगणघाट परीसरातील शहालंगडी मंदिर ते दालमिल मार्गे हायवेकडे जाणा-या रोडलगत असलेल्या अतीक्रमणवरील त्याचे झापडीमध्ये येवुन, गांजा अंमली पदार्थांची विक्री करीत आहे, अशा माहितीवरून पथकाने त्याचे झोपडीमध्ये एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, नमुद आरोपी हा तेथे हजर मिळुन आला असुन, झडती दरम्यान त्याचेजवळ गांजा अंमली पदार्थ मिळुन आल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपीचे ताब्यातुन निव्वळ 524 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, एक स्प्लेंडर प्लस मोटर सायकल क्र. MH-31/BQ-3075, मोबाईलसह जु.कि. 88,100 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली..
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link