एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जेजुरी पोलिसांचा रूट मार्च ! कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवा:- स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे आव्हान

जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जेजुरी पोलिसांचा रूट मार्च ! कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवा:- स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे आव्हान !

विशेष प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी

सन 2026 सर्वत्रिक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्या अनुषंगाने निवडणूक काळात पुणे ग्रामीण पोलीस आणि महसूल प्रशासनही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ग्रामीण भागातील काही संवेदनशील गावामध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलीस ठाण्याच्या ग्रामीण भागात आणि जेजुरी शहरांत पोलीस ठाणे यांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जातीय दंगा काबू पथकांचा सराव करण्यात आला. सदर रूट मार्च हा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी आपल्या पोलिस ठाणेकडील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह स्वता: या रूट मार्चमध्ये सहभाग नोंदवून पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्चमध्ये आरोग्य विभाग अग्निशामक दलाचे कर्मचारी, असे अधिकारी 47 पोलिस अंमलदार 1 आरसीपी पथक 7 शासकीय वाहने या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील गावांमध्ये कडक बंदोबस्त राहणार असल्याचेही सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सांगितले आहे.*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link