जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने वाठार पोलिसांचा रूट मार्च! कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवा:- सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांचे आव्हान ! शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उत्तर कोरेगांव तालुक्यांत निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वाठार पोलिसांचाही रूट मार्च संपन्न झाला. सदर रूट मार्च जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी स्वता: आज रोजी दिनांक 05/02/2026 रोजी वाठार पोलीस ठाणे हद्दीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सन 2026 अनुषंगाने खालील नमूद गावांमध्ये 16:30 ते 19:30 या वेळेत रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्चमध्ये 03 पोलीस अधिकारी व 17 पोलीस अंमलदार हजर होते
1) पिंपोडे बुद्रुक – गणेश मंदिर- बाजार चौक – जि प शाळा – झेंडा चौक – फौजी कमान
2) सोनके – फौजी कमान – भैरवनाथ मंदिर – ग्रामपंचायत चौक – एसटी स्टँड
3) अंबवडे सं वा – ग्रामपंचायत चौक भैरवनाथ मंदिर आजी-माजी फौजी संघटना कमान संघटना कमान – अंबवडे चौक
4) देऊर – एसटी स्टँड- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – ग्रामपंचायत चौक – जैन मंदिर – विठ्ठल मंदिर चौक
5) वाठार स्टेशन – जि प शाळा वाठार गाव – निष्णाई देवी मंदिर – वागदेव महाराज मंदिर – गणेश मंदिर – महादेव मंदिर – रेल्वे स्टेशन – वाई चौक अशा मार्गाने रूट मार्च घेण्यात आला यावेळी वाठार पोलिसांनी निवडणुकीच्या अनुषंगाने रूट मार्च घेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवा असा संदेश वाठार पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील जनतेला दिला आहे.








