एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जळगाव जिल्हा भारत स्काऊट्स् आणि गाईड्स संस्थेतर्फे प्राथमिक व प्रगत स्काऊट मास्टर प्रशिक्षण संपन्न

जळगाव जिल्हा भारत स्काऊट्स् आणि गाईड्स संस्थेतर्फे प्राथमिक व प्रगत स्काऊट मास्टर प्रशिक्षण संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील

जळगाव: विद्यार्थ्यांमध्ये स्काऊटिंगची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांसाठी तयार करता यावे, या उद्देशाने जळगाव जिल्हा भारत स्काऊट्स् आणि गाईड्स जिल्हा संस्थेमार्फत आयोजित सात दिवसीय ‘प्राथमिक व प्रगत स्काऊट मास्टर प्रशिक्षण’ शिबिर नुकतेच उत्साहात संपन्न झाले.
दिनांक २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत जिल्हा संस्था कार्यालय, जळगाव येथे हे निवासी प्रशिक्षण पार पडले. या शिबिरात जिल्ह्यातील विविध शाळांमधील स्काऊट मास्टर (शिक्षक) मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

*विविध उपक्रमांची मेजवानी :*
प्रशिक्षणादरम्यान जिल्हा कार्यालयाशेजारील महेश प्रगती मंडळाच्या बालवाडीच्या मैदानावर तंबू उभारून शिक्षकांना प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. सात दिवसांच्या या शिबिरात अनेकविध उपक्रम राबवण्यात आले:
*प्रायोगिक शिक्षण:* तंबू सजावट, मागाच्या खुणांच्या साह्याने मार्ग शोधणे.
*साहसी उपक्रम:* जंगल रात्र सहल (Night Hike).
*बौद्धिक व मनोरंजन:* बौद्धिक सत्रे, मनोरंजनात्मक खेळ, स्काऊट गीते आणि रात्रीच्या वेळी रंगलेला ‘शेकोटी’ (Campfire) कार्यक्रम, ज्यामध्ये शिक्षकांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.

*तज्ज्ञांचे मार्गदर्शन*
शिबिराच्या संचालिका सौ. वैशाली अवथळे व शिबिर प्रमुख श्री. रवींद्र कोळी यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये श्री. जी. यु. पवार, श्री. आर. सी. गोसावी, श्री. एस. एन. सोनवणे, श्री. के. एम. पाटील, डॉ. व्ही. एस. पाटील, सौ. एस. वाय. भोळे आणि सौ. रत्ना बागुल यांचा समावेश होता.

*दीक्षा समारंभ व समारोप*
३ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली यांच्या अध्यक्षतेखाली स्काऊट मास्टरचा दीक्षा समारंभ पार पडला. याप्रसंगी स्काऊट गाईड सचिव सौ. सरलाताई पाटील, सहसचिव श्री. डी. एस. सोनवणे आणि मुख्याध्यापक श्री. व्ही. एस. तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. आर. राठोड यांनी केले, तर स्काऊट मास्टर प्रशिक्षक श्री. टी. टी. सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी नवीन नेमाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कॅम्पच्या शेवटच्या दिवशी दि. 4/2/2026 ला सामुदायिक सर्वधर्म प्रार्थना घेण्यात आली. यात विविध धर्माच्या प्रार्थना या ठिकाणी सामूहिक रित्या म्हणण्यात आल्या. नंतर स्काऊट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण झाले. सर्वात शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सर्व तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना देखील ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी तसेच प्रशिक्षणार्थी स्काऊट मास्टर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे मन जिंकून घेतले व डोळ्यातून अश्रूच्या धारा येतील असा भावनिक आठवणी या कॅम्पच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना अनुभवास मिळाल्या. अशा रीतीने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link