एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

ठाणे गुन्हे शाखा पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुस्क्या

दिनांक ३१/०१/२०२६

प्रतिनिधी दौलत सरवणकर

TWJ ASSOCIATED PVT.LTD. या कंपनीचे संस्थापक/संचालक यांनी TWI नावाने इतर ११ कंपन्या उबडून गुंतवणूकदारांना बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्यप्राय परताव्याचे आमीष दाखवून गुंतवणूकदराचें सुमारे १२०० कोटी रुपयांचा अपहार केलेल्या ३ आरोपींना आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडून अटक.

दिनांक ०९/०२/२०२४ ते दिनांक १८/११/२०२५ या कालावधीत TWI ASSOCIATED PVT.LTD.

या कंपनीचे संस्थापक/संचालक १) समीर सुभाष नार्वेकर, २) अमित आलम, ३) संकेश रामकृष्ण घाग, खारवर बॅच चे मॅनेजर ४) सागर दत्ताराम कदम व TWJ ASSOCIATES PVT.LTD. या कंपनीने वागळे इस्टेट अॅप वे मॅनेजर ५) सौरव बोंडे यांनी ठाणे सह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १६ विविध जिल्हयांमध्ये TWJ ASSOCIATES PVT.LTD. या कंपनीचे अंतर्गत 1/TWJ LEARNING SOLUTIONS PVT.LTD. 2) TWJ HOSPITALITY PVT.LTD. 3) TWJ INFRASTRUCTURE DEVELOPMENT PVT.LTD. 4) TWJ BUSINESS CONSULTING PVT.LTD. 5) TWJ EVENT MANAGEMENT PVT.LTD. 6) TWJ FOUNDATION 7) TWJ VASTUNIRMITI INFRA PVT.LTD. 8) TWJ IT SOLUTIONS PVT.LTD. 9) TWJ VENTURES PVT.LTD. 10) TWJ LOGISTICS PVT.LTD. 11) TWJ MEDIA PVT.LTD. अशा विविध कंपन्या उघडून सदर कंपन्यामध्ये सुमारे ११,००० गंतवणुकदारांना बेकायदेशीर योजनांमध्ये अशक्यप्राय परताव्याचे आमीष दाखवून सुमारे १२०० कोटी रुपयांचा अपहार केलेबाबतची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे प्राप्त झाली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीअंती श्रीनगर पोलीस ठाणे येथे फिर्यादी श्री. संजय पुंडलीक मापुसकर, वय-५४ वर्षे, रा. विक्रोळी पूर्व, मुंबई यानी गु.र.नं. ८१०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१६(५), ६१(२) सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम कलम ३ प्रमाणे यांनी दिनांक १९/११/२०२५ रोजी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरूवातीस फियोदी यांचेसह इतर १३ गुंतवणूकदार यांची ३,०८,५०,०००/- रुपये एवढी अशी एकूण ३ कोटी ६४ लाख ३७ हजार ५८० इतकी फसवणूक झाली होती. सदर गुन्हयाचे तपासात एकूण ३७गुंतवणूकदार यांची ७ कोती. ९७ हजार ८६९ रुपयांची वरील नमुद आरोपींत यांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींत यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण १२०० कोटी रूपयाची फसवणूक करून गुंतवणूकदारांची रक्कम अपहार केल्याचे प्रथमदर्शन दिसून आले आहे. सदर गुन्हा दाखल झालेपासून वरील नमुद आरोपी आपले अस्तित्व लपवीत होते, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आरोपीचा कसोशीने शोध घेऊन गुन्हयातील निष्पन्न आरोपी १) समीर सुभाष नार्वेकर वय-३५ २) अमित विश्वनाथ बालम वय ३७ यांना दिनांक २९/०१/२०२६ रोजी अटक ३) नेहा समीर नार्वेकर वय ३६ यांना दिनांक ३०/०१/२०२६ रोजी अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सदर कामगिरी मा.श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, मा.श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे, श्री. पंजाबराव उगले, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), ठाणे, मा.श्री. पराग मणेरे, पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे, श्रीमती निलीमा पवार, सहा. पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती माधवी राजेकुंभार, आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे (तपासी अधिकारी) व तपास पथकातील पोहबा / नितीन औबळेकर, पौहबा/गुरूप्रसाद तोडणकर, पोना/योगेश चौगुले, पोना/निशीकांत पाटील, मधोशि/कविता कोळपे यांनी केली असून प्रस्तुत गुन्हयाचा तपास स्वतः करित आहेत.

तरी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात वरील पध्दतीने TWJ ASSOCIATED PVT.LTD या कंपनीने अशक्यप्राय परताव्याचे आमीष दाखवून ज्या गुंतवणुदारांची फसवणुक झाली आहे अशा गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे येथील श्रीमती माधवी राजेकुंभार, मो.नं ८८०५४८६१००/०२२.२५३९८५८६या क्रमांकावर सपंर्क साधावा असे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link