गृहिणी ते उपमुख्यमंत्री अजित दादा सारखेच, सुनेत्रा वहिनीसाहेब सुध्दा उत्तम प्रशासक उपमुख्यमंत्री पदावर आता महिलाराज !
संभाजी पुरीगोसावी पुणे जिल्हा प्रतिनिधी
सुनेत्रा अजित पवार या पती अजित दादांच्या विमान अपघाती निधनानंतर महाराष्ट्रांच्या उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. खरे तर राजकीय कुटुंबात जन्मलेल्या सुनेत्रा पवार यांचा विवाह राजकारणातील कुटुंबाशी झाला असला तरी ही सोयरीक त्यांना प्रत्यक्ष सत्तापर्यंत घेवुन जाईल हा त्यांच्या कुंडलीतला योग कोणी कधीच ताडलीला नसले, मला राजकारणात रस नाही… असे स्पष्ट म्हणणाऱ्या सुनेत्रा अजित पवार आज महाराष्ट्रांच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.1963 मध्ये (धाराशिव) जिल्ह्यात जन्मलेल्या सुनेत्रा यांनी 38 वर्षाच्या अजित पवार यांच्याबरोबरील सह जीवनात राजकारणातील अनेक चढउतार पाहिले आहेत. लोकसभेला स्वतः व मुलाला पराभव पचवला आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमिंत्ताने प्रत्यक्षात राजकारणात आलेल्या सुनेत्रा पवार आज राज्यसभा खासदार असल्या तरी सामाजिक कामाचा शुभारंभ त्यांनी सासरी काटेवाडीतूनच केला होता. अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरांतून शोक केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांनी मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते. सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. आज सकाळपासून मुंबईत राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता सुनेत्रा पवार यांच्यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला रवाना झाल्या. अजित पवार यांचा दहावा होईपर्यंत त्या बारामतीत मुक्काम करणार आहेत. सूत्रांच्या माहितीवरून दुखवटा संपेपर्यंत त्या नेते व कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्या तरी या काळात कोणतेही हार,तुरा किंवा सत्कार स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शोकाकुल वातावरणात साधेपणा आणि संवेदनशीलता जपण्यावर त्यांचा भर असणार आहे. सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोंबर 1963 रोजी तेर जिल्हा (धाराशिव) या ठिकाणी झाला माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा पवार राजकीय वारसा हा जन्मताच लाभलेला होता. 1985 मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतरही काटेवाडी (ता. बारामती) येथे आल्यावर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. घरांपासून ते राजकारणापर्यंत अजित पवारांना त्यांची नेहमीच साथ राहिली होती.*








