एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख
श्रीमान बाळासाहेब ठाकरे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख
श्रीमान बाळासाहेब ठाकरे
यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य आणि प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय अभियान पवित्र क्षणी, बाळासाहेबांच्या विचारांना कृतीचे रूप देणारा एक अर्थपूर्ण आणि ठाम राजकीय संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला.
आज केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हीच खरी शिवसेना_संस्कृती_आहे—आणि हीच भूमिका शिवसेना युवा नेतृत्व राहुल_बाबासाहेब_घुले यांनी आपल्या कार्यातून पुन्हा एकदा ठामपणे मांडली.
ज्या मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांकडे समाजाने अनेकदा पाठ फिरवली, त्या विद्यार्थ्यांच्या हातात चित्रकलेचे साहित्य, सूचना फलक आणि व्यंगचित्रांची_पुस्तके_देताना, शिवसेना_म्हणजे_केवळ_सत्ता_नव्हे, तर संवेदनशीलता” हा स्पष्ट राजकीय संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे ही फक्त कला नव्हती ती व्यवस्थेविरोधातील आवाज होती, अन्यायाविरुद्धची धार होती आणि सामान्य माणसाच्या बाजूने उभी राहणारी निर्भीड विचारधारा होती.
आज त्या विचारांना समाजकार्याचे रूप देत,मा_संचालक_कृषी_उत्पन्न_बाजार_समिती राहुल_बाबासाहेब_घुले_पाटील एनडीए सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ_आबा_मोकाशी,
पंचशील तरुण मंडळाचे अध्यक्ष_राजेंद्रजी_गायकवाड,
विशेष कार्यकारी अधिकारी महेश_दादा_घुले,
अध्यक्ष दीपक_मामा_शेलार,
विजयजी_दारवटकर, निखिल_दादा_जवळकर,
अभिदादा_शेडगे, नितीनजी_भामे, अविनाश_सरोदे, आणि मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या शिव, फुले, शाहू आंबेडकर विचारधारेच्या श्रावस्ती फाउंडेशन आधार संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा_कांचनताई_कदम, साहित्यरत्न_डॉ_गणेश_भाऊ_राऊत यांनी हेच दाखवून दिले की,
शिवसेना जिवंत आहे—आणि ती रस्त्यावर, माणसांच्या दुःखात आणि समाजाच्या गरजांमध्ये उभी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी संविधानाने दिलेल्या समता, बंधुता आणि मानवी सन्मानाच्या मूल्यांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा हा उपक्रम म्हणजे, केवळ सामाजिक कार्य नाही तर भविष्यातील संवेदनशील आणि विचारशील नेतृत्वाची दिशा आहे.


ही आदरांजली शब्दांची नाही,
बाळासाहेबांच्या विचारांशी इमानी निष्ठा दाखवणारी कृतीची आहे.
आज राजकारणात स्वार्थ, दिखावा आणि संधीसाधूपणा वाढत असताना,
शिवसेना आणि समस्त शिवसैनिकांचे कार्य ठामपणे सांगते—
शिवसेना म्हणजे माणुसकी, शिवसेना म्हणजे बांधिलकी, आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेबांचे विचार. मांडले

जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link