एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नांदेडच्या विकासासाठी हवा दूरदर्शी महापौर – गजानन जोशी

नांदेडच्या विकासासाठी हवा दूरदर्शी महापौर – गजानन जोशी

सखाराम कुलकर्णी नांदेड

【माजी मुख्यमंत्री – खासदार – जिल्हाध्यक्षांना – देवाभाऊ फाऊंडेशन विकासात्मक मागण्यांचे पत्र देणार…!】
वृत्तसेवा – नांदेड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत यंदा सर्वसाधारण संवर्गातील महिलांना नेतृत्वाची संधी मिळणार आहे. मात्र ही संधी पाहता केवळ आरक्षणापुरती मर्यादित नसून नांदेडकरांच्या भवितव्यास दिशा देणारी ठरावी,अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. नांदेडमधील महिला महापौरपदाचा नांदेडकरांचा अनुभव आजवर फारसा समाधानकारक राहिलेला नाही,कारण शिक्षणाचा अभाव,प्रभावी नेतृत्वाची कमतरता,सभागृहात प्रशासनावर पकड नसणे आणि प्रत्यक्ष कारभार पडद्यामागून अन्य कुणी चालवत असल्याचा कटू अनुभव नांदेडकरांनी घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची महापौर निवडणूक केवळ औपचारिक ठरू नये,अशी अपेक्षा नागरिकांमध्ये दिसून येत आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा,विकासाचे रखडलेले प्रकल्प,पायाभूत सुविधांचे प्रश्न आणि प्रशासनावर सक्षम नियंत्रण ठेवण्याची गरज लक्षात घेता, यावेळी नांदेडला केवळ ‘महिला महापौर’ नव्हे तर सुशिक्षित,अनुभवसंपन्न,नेतृत्वगुणांनी परिपूर्ण आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचे स्पष्ट दूरदर्शी/दूरदृष्टी असलेली महापौर हवी आहे. महापौरपदाची ही संधी शहराच्या प्रगतीचा टर्निंग पॉईंट ठरावी,अशी भावना आता नागरिकांतून प्रकर्षाने व्यक्त होत असून,शहराच्या सर्वांगीण विकासात्मक धोरणाबाबत लवकरच देवाभाऊ फाऊंडेशनतर्फे नागरिकांचे जाहीर मागणीपत्रक माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब व माजी आमदार तथा भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजूरकर साहेबांना दिले जाणार असल्याचे देवाभाऊ फाऊंडेशन मुख्य समन्वयक गजानन जोशी यांनी सांगितले…

—- चौकट —-

अशी असावी महिला महापौर
१. उच्च शिक्षण आणि शासकीय, आणि प्रशासकीय प्रक्रियेची जाण
२.आत्मविश्वासपूर्ण आणि ठाम निर्णय घेण्याची क्षमता
३. सभागृह चालवण्याचे कौशल्य आणि नियमांची सखोल माहिती
४. प्रशासन,नगरसेवक आणि नागरिकांशी प्रभावी संवाद
५. स्वतंत्र विचारसरणी स्वनिर्णयक्षमता
(पडद्यामागील नियंत्रण नाकारणारी भूमिका)
६. शहराच्या विकासासाठी स्पष्ट व्हिजन आणि दीर्घकालीन दृष्टीकोन
७. अनुभवातून आलेली परिपक्वता आणि संयम
८. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालण्याची समन्वयक वृत्ती
९. भ्रष्टाचार विरोधी ठाम भूमिका आणि

१०. महिलांच्या प्रश्नांबरोबरच संपूर्ण शहराच्या प्रश्नांकडे समान गांभीर्याने पाहण्याची मानसिकता

गजानन जोशी
मुख्य समन्वयक – देवाभाऊ फाऊंडेशन, महाराष्ट्र

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link