एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे समर्थ पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

पुणे समर्थ पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला केले जेरबंद

दिनांक ०८/०१/२०२६ रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, अज्ञात आरोपीने फिर्यादी यांचे घरात प्रवेश करून घरातील ९०,०००/-रु सोन्याचे दागिने चोरी नेले बाबत तक्रार दिल्यावरून समर्थ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०४/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (३), ३०५ (अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल असुन दाखल आहे.

मा. वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्हयातील अज्ञात चोरटयाचा समर्थ पोलीस स्टेशनकडील पोलीस तपास पथक शोध घेत असताना तपास पथकाने समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच पुणे शहर परीसरातील तब्बल १२६ सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन दाखल गुन्हयातील चोरटया इसमांचा मागोवा काढत घरफोडी करणा-या इसमांपर्यंत पोहचुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल तपास केला असता आरोपीने त्याचे नाव सोहेल समिर शेख, वय-२६ वर्षे, रा.१०५३ न्यु नाना पेठ, पत्राचाळ, पुणे. असे सांगुन दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली असता नमुद आरोपीस दिनांक २०/०१/२०२६ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन दाखल गुन्हयातील चोरी केलेल्या. ९०,०००/-रू. किं.चे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असुन दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. अटक आरोपींबाबत आधिक माहिती काढली असता सदर आरोपींवर पुणे शहर परीसरात चोरीचा, गुन्हा यासारखे ०२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर, श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे), समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. चेतन मोरे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक धिरज राऊत, पोलीस अंमलदार संतोष पागार, रविंद्र औचरे, रोहीदास वाघेरे, शिवा कांबळे व अमोल गावडे यांनी केली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link