महानगरपालिका निवडणूक पूर्व रात्री पोलिसांची मोठी कारवाई; अकोल्यात 50 लाखांची रोकड जप्त
प्रतिनिधी निलकंठ वसु पाटील
अकोला : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून, गोरक्षण परिसरात रात्री पेट्रोलिंग दरम्यान मोठी कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एका दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाकडून तब्बल 50 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
ही कारवाई निवडणूक आचारसंहिता लागू असताना करण्यात आली असून, सदर रोकड मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरण्यात येणार होती का, या दृष्टीने अकोला पोलीस सखोल तपास करत आहेत. संबंधित तरुणाकडे एवढ्या मोठी
रोकड जप्त करून पुढील चौकशी सुरू केली असून, निवडणूक आयोगालाही याबाबत माहिती देण्यात येणार आहे. या घटनेमुळे अकोला शहरात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अकोला पोलीस प्रशासनाने निवडणूक काळात अशा बेकायदेशीर व्यवहारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.








